जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात सोमवारी…या सुवर्ण पेढीचे उदघाटन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यातील विश्वास पात्र समजल्या जाणाऱ्या ‘बागुल सराफ’ या सुवर्ण पिढीचे येत्या सोमवार दि.०१ नोव्हेम्बर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास श्री क्षेत्र सराला बेटांचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व गटनेते योगेश बागुल यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात बागुल पिढी हे प्रतिष्ठित सुवर्ण पेढी समजली जाते.त्यांनी ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केलेला आहे.या पेढीने आता ग्राहकांच्या विश्वासावर मोठे स्वरूप धारण केले असून त्याचे नूतन जागी स्थलांतर होत असून अहिंसा स्तंभाजवळ इंदिरा शॉपिंग,व पंचशील मोबाईल शेजारी असलेल्या जागेत मान्यवरांच्या उपस्थितीत हस्ते हे स्थलांतर होत आहे.

त्यासाठी महंत श्री रामगिरीजी महाराज यांचे बरोबरच जंगली महाराज आश्रमाचे महंत परमानंद महाराज,स्वामी रमेशगिरीजी महाराज,यांचे हस्ते हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

या शिवाय या कार्यक्रमासाठी शिर्डी लोकसभेचे सेनेचे खा.सदाशिव लोखंडे,तालुक्याचे आ.आशुतोष काळे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,गोदावरी-परजणे तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,सेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे.

तरी या कार्यक्रमास ग्राहकांनी व नागरिकांनी मोठ्या संखने उपस्थित रहावे असते आवाहन यापेढीचे संचालक योगश बागुल व ओम बागुल यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close