सण-उत्सव
कोपरगावात रमजान ईद उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पवित्र रमजानचा महिना प्रार्थना-साधना,संयम,दान आणि मनाचे पावित्र्य जपण्याचा महिना असून संपूर्ण रमजान महिना शरीर आणि हृदय दोन्ही शुद्ध ठेवून केलेले रोजा (उपवास),तराबीची नमाज अदा करून केलेली प्रार्थना अल्लाहला समर्पित होवून तुमच्या सर्व इच्छा,आकांक्षा पूर्ण होवोत व तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा आ.आशुतोष काळे यांनी रमजान ईद निमित्त मुस्लीम बांधवांना नुकत्याच दिल्या आहेत.

रमजान ईदच्या दिवशी मशिदींमध्ये नमाज अदा करत मुस्लिम बांधव अल्लाह कडे प्रार्थना करत आभार व्यक्त करतात. ‘ईदी’च्या स्वरूपात लहान मुलांना पैसे किंवा भेटवस्तू मिळते त्यामुळे त्यांना देखील या रमजान ईदची विशेष उत्सुकता असते.कोपरगावात हा सण मुस्लिम बांधवांनी मोठया उत्साहात संपन्न केला आहे.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कोपरगाव शहरात ‘रमजान ईद’चा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्व मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदान व अक्सा मस्जिद येथे सामुदायिक नमाज पठण केले आहे.या प्रसंगी आ.आशुतोष काळे यांनी सर्व मुस्लीम बांधवाना गळाभेट घेवून ‘रमजान ईद’ च्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी नगरसेवक,कार्यकर्ते व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मुस्लीम धर्मात रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो.मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्यात मिळालेल्या आध्यात्मिक सिद्धी आणि आशीर्वाद साजरे करण्याचा ‘रमजान ईद’ आनंदाचा आणि बंधू भावाचा सण आहे.अल्लाहची तुमच्यावर कृपा होवून तुम्हाला व तुमच्या प्रियजनांना सुख,शांती लाभेल व अल्लाहचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहतील.
कोपरंगाव येथील मुस्लीम बांधवांची गळाभेट घेवून रमजान ईदच्या शुभेच्छा देतांना आ.आशुतोष काळे दिसत आहे.