कोपरगाव तालुका
गौतम पब्लिक स्कूलमध्ये प्रभू येशूचा जन्मदिन उत्साहात साजरा
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गौतम पब्लिक स्कूलमध्ये सालाबादप्रमाणे (दि.२१) डिसेंबर रोजी नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभिषेक काळे व शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.
यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रभू येशुची स्तुतीपर गीते सदर केली. यावेळी तब्बल १२५ सांता, ८० परी व १ मेरी नी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रम प्रसंगी शाळेचे शिक्षक जुनेद शेख यांनी नाताळ सणाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी बांबू नृत्य करणाऱ्या सांतांनी उपस्थितांची मने जिंकली. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आ.आशुतोष काळे व सचिव चैताली काळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गौतम युरोकिड्स प्री-प्रायमरी स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांताच्या वेशभूषेत कार्यक्रर्मात सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत केला. त्याचबरोबर नुकत्याच महाराष्ट्र बटालियन मार्फत बीड येथे आयोजित एन.सी.सी. कॅम्प यशस्वी पूर्ण करून आलेल्या शाळेतील १२ एन.सी.सी. कॅडेट्सला प्रशस्तीपत्रक व मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी आपल्या मनोगतात सर्वधर्म समभाव या मुल्यांची विद्यार्थ्यांमध्ये रुजवणूक व्हावी यासाठी वर्षभर सर्व धर्मियांचे सण उत्साहाने साजरे केले जातात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्व धर्म सहिष्णुता हे मूल्य रुजवण्यास मदत होते. यासाठी संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त व कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे व सचिव चैताली काळे यांचे मोलाचे पाठबळ मिळत असते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युरोकिड्स प्री- प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका विमल राठी, क्रीडा संचालक सुधाकर नीलक, शिस्त विभाग प्रमुख रमेश पटारे, पर्यवेक्षिका ज्योती शेलार, सुनिता कुलकर्णी, कलाशिक्षक गोरक्ष चव्हाण, कपिल वाघ, उत्तम सोनवणे, संजय इटकर, सुजाता ससाणे, शबाना सय्यद, सुरय्या पठाण, राणी वारुळे, निकिता आदिक, युरोकिड्स प्री-स्कूलच्या सर्व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रेखा जाधव तर आभार कविता चव्हाण यांनी मानले.