जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सरकार न्यायालयाच्या निर्णयाची अंमल बजावणी करत आहे-अड्-बोरावके

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणला असून हा कायदा एका विशिष्ठ समाजाविरुद्ध असल्याचा अपप्रचार करून राजकीय पोळ्या भाजण्याचे काम काही जण करीत आहे.कोणाचे हक्क काढून घेण्यासाठी हा कायदा नाही मात्र त्यावरून रणकंदन माजवले जात आहे. त्यातून देश संपत्तीचे नुकसान होत आहे.दुसरीकडे सरकार न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करीत असल्याने या कायद्याच्या समर्थनार्थ आता देशातील जनतेने एकत्र येणे हि काळाची गरज आहे असे प्रतिपादन भाजपचे कार्यकारणी सदस्य रवींद्र बोरावके यांनी नुकतेच केले आहे.

सदर प्रसंगी अड्.जयंत जोशी यावेळी म्हणाले, हा कायदा नेमका काय आहे हे अजून समाजातील अनेकानी समजवून घेतले नसल्याने हि परीस्थिती निर्माण झाली असून त्याची जनजागृती जनसामान्यात होणे गरजेचे आहे. कायद्याच्या विरोधात अपप्रचार करणार्यांना देखील प्रसंगी समजावून सांगू. सुधीर डागा म्हणाले,देशातील मुस्लीम बांधवाना देखील विश्वासात घेणे आवश्यक असून हा कायदा देश व नागरिकांच्या हिताचा आहे.

नागरिकत्व दुरुस्ती व एन आर सी कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरु असून त्यातून देशाच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे.या पार्श्वभूमीवर या नागरित्व कायद्याच्या समर्थनार्थ कोपरगावात एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत मंगळवार दि .२४ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून कायद्याच्या समर्थनार्थ फेरी काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

या बैठकीस अँड जयंत जोशी , नरेंद्र मोदी विचार मंचाचे विनायक गायकवाड,भाजप तालुकाध्यक्ष कैलास खैरे, व्यापारी संघटनेचे सुधीर डागा, सुनिल बंब , चेतन खुबानी, चेतन वाणी,प्रा. सुभाष शिंदे ,नगरसेवक सत्येंन मुंदडा आदींसह कार्यकर्ते ,नागरिक ,युवक उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते बोरावके म्हणाले, “दंगली घडविणारे कोण याचा शोध घेतला पाहिजे. पंतप्रधान मोदीचे काम पाहून अनेकांना धडकी भरली आहे. या कायद्यानिमित्त विरोधी पक्षातील खदखद बाहेर पडत असून हिंदुस्तान म्हणजे काही धर्मशाळा नाही .विरोधक ,काही दूरचीत्रावाहिनी अपप्रचार करून देशाविरुद्ध षडयंत्र करीत आहे.यावेळी सुनील बंब ,सुशांत खैरे सह अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close