जाहिरात-9423439946
समाजकल्याण विभाग

मुलां-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

शिर्डी-(प्रतिनिधी)

मागासवर्गीय मुलां-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी,त्यांना उच्च शिक्षण घेता यावे,त्याचप्रमाणे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे,यासाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत.सदरची योजना सन-१९२२ पासून कार्यान्वित आहे.सध्या अहमदनगर जिल्ह्यात १८ वसतिगृह मंजूर आहेत.यात मुलांची ०९ व मुलींची ०९ वसतिगृह कार्यान्वीत आहेत.या वसतिगृहात १२५३ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होत आहे.

लाभाचे स्वरुप :
१) मोफत निवास व भोजन, अंथरुण पांघरुण, ग्रंथालयीन सुविधा.
२) शालेय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी दोन गणवेष.
३) क्रमिक पाठ्य पुस्तके, वहया, स्टेशनरी इत्यादी.
४) वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्याना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप,अॅप्रन,ड्रॉईंग बोर्ड,बॉयलर सूट व कला निकेतनच्याविद्यार्थ्यासाठी रंग,ड्रॉईंग बोर्ड,ब्रश,कॅनव्हास इत्यादी.
५) वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता.

निर्वाहभत्ता :-
विभागीय पातळीवर –दरमहा रू.८००/-
जिल्हा पातळीवर -दरमहा रू.६००/-
तालुका पातळीवर – दरमहा रू.५००/-

अटी व शर्ती :-
१)गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.
२)विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
३) प्रवेशीत विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्नरु ०२,००,०००/- पेक्षा जास्त नसावे.
४)विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येईल.
५)अर्ज करावयाची मुदत शालेय विद्यार्थ्यासाठी १५ मे पूर्वी,महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी ३० जून पर्यतकिंवा निकाल
लागल्यापासून १५ दिवसांचे आंत.
६) सन-२०१४-१५ पासून शासन स्तरावरून शासकीय वसतिगृहात जागेपैकी १०% प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या जागा हया
खासबाब म्हणून अटी व शर्तीस अनुसरुन व गुणवत्तेनुसार भरण्यात येतात आणि ५% खासबाब म्हणून अनाथ तसेच
मांग भंगी, मेहतर या जातीतील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते.

संपर्क :-
१) सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,अहमदनगर.
२)प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण विभाग,नाशिक.
३) गृहपाल, मागासवर्गीय मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृह.

(संकलन सौजन्य–उप माहिती कार्यालय,शिर्डी)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close