कोपरगाव तालुका
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या- आ. आशुतोष काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सन २०१८-१९ च्या खरीप हंगामामुळे कृषी क्षेत्राचे मोठ्ठे नुकसान होऊन शेतकरी डबघाईला आला होता.अन्य तालुक्यांना सरकारने नुकसान भरपाई दिली मात्र कोपरगाव तालुक्याला वगळण्यात आले होते.अद्यापही तालुक्यातील ३४ गावांना १६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली नाही ती त्वरित मिळावी अशी मागणी कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नितीन राऊत यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
कोपरगाव मतदार संघातील अनेक नदी व नाल्यांवर छोट्या पुलांची आवश्यकता असून पढेगाव, शिरसगाव येथील कोळ नदीवरील पूल, उक्कडगाव-तिळवणी पुल, कोपरगाव पुणतांबा रस्त्यावरील कातनाल्यावरील पूल, शिंगवे येथील नाल्यावरील पूल, धामोरी येथील गुही नदीवरील पूल व वेस येथील नाल्यावरील पूल आदी ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून रहदारीस अडथळा निर्माण होतो त्यामुळे शेतकरी, दुग्धव्यवसायिक व विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. मात्र अवर्षणग्रस्त कोपरगाव तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळला होता. आमरण उपोषण व शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर कोपरगाव तालुक्यातील ३४ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला परंतु या गावातील नागरिकांना अद्याप दुष्काळी अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. या गावातील नागरिकांना दुष्काळी अनुदानाची रक्कम द्यावी.ऑगस्ट महिन्यात गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळावी. तसेच नाबार्ड अंतर्गत कोपरगाव मतदार संघातील छोट्या पुलांच्या कामासाठी निधी मिळावा व कोपरगाव न्यायालय इमारत आणि १८०० मेट्रिक टन क्षमतेचे धान्य गोदाम बांधकाम प्रस्तावास मंजुरी मिळावी.
कोपरगाव मतदार संघातील अनेक नदी व नाल्यांवर छोट्या पुलांची आवश्यकता असून पढेगाव, शिरसगाव येथील कोळ नदीवरील पूल, उक्कडगाव-तिळवणी पुल, कोपरगाव पुणतांबा रस्त्यावरील कातनाल्यावरील पूल, शिंगवे येथील नाल्यावरील पूल, धामोरी येथील गुही नदीवरील पूल व वेस येथील नाल्यावरील पूल आदी ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून रहदारीस अडथळा निर्माण होतो त्यामुळे शेतकरी, दुग्धव्यवसायिक व विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे याठिकाणी पूल बांधणे अत्यंत गरजेचे असून नाबार्ड योजने अंतर्गत नवीन पुलांच्या कामास मंजुरी मिळावी. कोपरगाव शहरातील माजी आ.अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत बांधलेली आहे. मात्र न्यायालयाच्या इतर इमारती अतिशय जीर्ण झाल्या असून मोडकळीस आलेल्या असून या न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी मिळावा. कोपरगाव शहरात धान्य माल साठवून ठेवण्यासाठी असलेले गोदाम अपुरे पडत असल्यामुळे अनेकवेळा धान्यमाल उघड्यावर ठेवावा लागतो. कोपरगाव शहरात नगर-मनमाड महामार्गालगत जलसंपदा हद्दीत नवीन एखादे मोठी क्षमता असलेले धान्य गोदाम बांधणेसाठी रुपये ३ कोटी ३३ लाख रक्कमेचा सदर प्रस्तावास मंजुरी द्यावी आदी मागण्या आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात मंत्री ना. राऊत यांच्याकडे केल्या आहेत.