जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आ. काळे यांनी साठवण तलावाच्या निधीसाठी केली शरद पवार यांचेकडे मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या नागरिकांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाच नंबर साठवण तलाव आवश्यक असल्याने आ.आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलावाचा मुद्दा सातत्याने उचलून धरला असून या साठवण तलावाचे काम तातडीने सुरु व्हावे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.


कोपरगाव शहराच्या नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावांची साठवण क्षमता कमी झाल्यामुळे शहरातील नागरिकांना सातत्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेणे कोपरगावच्या नागरिकांना २०१६ च्या उन्हाळ्यात तब्बल २३ दिवसांनी व मागील उन्हाळ्यात १५ दिवसांनी पाणी पुरवठा केला आहे. साठवण तलावांची साठवण क्षमता कमी झाल्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी आरक्षित असलेला पाणीसाठा पूर्णपणे उचलला जात नाही. या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करावे यासाठी आ.आशुतोष काळे यांनी मागील पाच वर्षात आमरण उपोषण, धरणे आंदोलन व न्यायालयात जाऊन या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले आहे.

कोपरगाव शहरातील नागरिकांना सातत्याने भेडसावत असणाऱ्या पाणी टंचाईवर नवीन पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु होणे हा पर्याय आहे. यापूर्वी कोपरगाव शहरासाठी शरद पवार यांनी ४२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना दिलेली आहे. कोपरगाव शहराचा बिकट झालेला पाणीप्रश्न शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमातूनच सुटू शकतो असा विश्वास असल्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी शरद पवार यांना कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लक्ष घालावे असे निवेदन देऊन आवाहन केले आहे. आ.आशुतोष काळे निवडणुकीपूर्वी व निवडून आल्यानंतरही सातत्याने चार नंबर साठवण तलावाचे खोलीकरण व पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close