कोपरगाव तालुका
…या विद्यार्थिनीस कराटे स्पर्धेत मिळाले सुवर्ण पदक
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
नुकत्याच संपन्न झालेल्या ट्रॅडिशनल शोटोकॉन कराटे स्पर्धेत कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयातील पहिलीतील विद्यार्थिनी कु. श्रावणी राहुल भागवत हिला कथा व फाईट मध्ये सुवर्ण पदकाची कमाई केल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र ट्रॅडिशनल शोटोकॉन कराटे असोसिएशन नुकत्याच दहाव्या ट्रॅडिशनल शोतोकाँन चॅम्पियन स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत तिने कथा व फाईट मध्ये सुवर्ण पदक मिळवून या स्पर्धेचे सन्मान चिन्ह मिळवले आहे.तिला कराटे प्रशिक्षक सुदर्शन पांढरे,स्नेहल मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले होते.तिच्या या यशाचे शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खैरनार यांचेसह शाळा समितीचे अध्यक्ष,समिती सदस्य शिक्षक पालक यांच्यासह सर्वत्र कौतुक होत आहे.