जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अध्यात्माची जोड दिल्याने सामाजिक काम करण्याचे बळ मिळते-ना.थोरात

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)
अध्यात्माची जोड दिल्याने मानवतेची सेवा करणायचे बळ माणसाला मिळते व तो माणूस आयुष्यात यशस्वी होत असल्याचे प्रतिपादन नामदार तथा काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे एका कार्यक्रमात बोलताना काढले आहे.

कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आदिवासी शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, विभागीय क्रिडा स्पर्धा व विज्ञान,गणित कलादालन प्रदर्शन उदघाटन समारंभ नुकताच राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

यावेळी आ सुधीर तांबे म्हणाले की, प्रसन्न आणि पवित्र प्रांगणामध्ये या क्रीडा स्पर्धा व प्रदर्शन झाले आहे.आत्मा मलिक ध्यानपीठ एक मोठी आध्यत्मिक शक्ती आहे.आपण प्रत्येक जण एक आहोत समान आहोत अशी शिकवण आत्मा मालिका मधून दिली जाते. आ लहू कानडे म्हणाले की, खेळ माणसाला सुदृढ बनवण्याचे काम करते. आत्मा मलिक मध्ये या स्पर्धा भरलेल्या असल्याने त्यामुळे येथून मनाची सुदृढता देखील होईल.

सदर प्रसंगी शिर्डीचे खा. सदाशिव लोखंडे,आ.सुधीर तांबे, आ. लहू कानडे,आदिवासी नाशिक विभाग अपर आयुक्त गिरीश सरोदे ,उपायुक्त प्रदीप पोळ, प्रकल्प प्रमुख संतोष ठुबे,आदिवासी सेवक बाबा खरात,नाशिक नगरसेवक राहुल दिवे,प्रांताधिकारी गोविंद शिंदे, कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे , राजेंद्र पिपाडा, अशोक खांबेकर, आत्मा मालिक माऊली,परमानंद महाराज, निजानंद महाराज व संत मांदियाळी आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठल होन, विश्वस्त प्रकाश भट , प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, वसंत आव्हाड, माधव देशमुख, सर्व प्राचार्य आदि मान्यवरसह भावीकभक्त मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,विज्ञान प्रदर्शन,क्रीडा स्पर्धा, आणि एव्हरेस्ट सर करणाऱ्या मुली आपल्यात आहे ही मोठी समाधानाची गोष्ट आहे. आदिवासी समाज जिद्दी ,चिकाटीने वागतात म्हणवून शिक्षण,खेळात असे सन्मानचिन्ह मिळवतात. यासाठी शासन देखील हीच मुले ऑलम्पिक मध्ये दिसायला हवी असा आशावादही त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

अपर आयुक्त गिरीश सरोदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यावेळी ते म्हणाले की,१९ स्पर्धां मधून २ हजार नऊशे विद्यार्थी भाग घेत असून , यापुढे यातील विद्यार्थी राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेत निवडले जाणार आहे.दर वर्षी प्रमाणे आमचे नाशिक विभागातील विद्यार्थीच राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणार असा विश्वास दर्शविला आहे. विज्ञान व गणित यातील विद्यार्थ्यांना गोडी निर्माण व्हावी म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले जाते.

यावेळी परमानंद महाराज म्हणाले की, एके काळी २३ वर्षांपासून शालेय ज्ञान व संस्कार देन्याचे काम आत्मा मालिक ध्यानपीठ करते आहे. आदिवासी विभागाचे साडे सहा हजार विद्यार्थी आत्मा मालिक मध्ये शिक्षण घेत आहेत . तसेच विशेष म्हणजे आत्मा मालिक चे विद्यार्थी राज्याचे देखील नेतृत्व करता.व्यक्तिमत्त्व विकास साधायचा असेल तर स्वतःच्या आतील शक्ती म्हणजेच आत्मा याला ओळखलं पाहिजे .जो आत्म्याचे चिंतन करतो त्याचेच जीवन खरे होते असेही परमानंद महाराज म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close