जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात कोरोना वाढ रोडावली

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव जिल्हा परिषद गटात बहादरपूर ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून आल्या नंतर आता कोपरगाव प्रशासनाला जाग आली असून त्यांनी बहादरपूर हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले असले तरी आज आलेल्या अहवालात या गटात ०५ रुग्ण आढळून आले आहे.त्यात सर्वाधिक ०२ रुग्ण रांजणगाव देशमुख व अंजनपूर ग्रामपंचायत हद्दीत असून त्या खालोखाल पोहेगाव येथे ०१ आढळून आला आहे.तर अन्य माहेगाव देशमुख-०२ तर चासनळी,कारवाडी,मंजूर शिंगणापूर येथे प्रतेकी-०१ तर शहरात ०४ रुग्ण आढळून आले आहे.एकूण १५ रुग्ण तालुक्यात बाधित आढळले आहे.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १४ हजार १७६ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १५१ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१७ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५३ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ७६ हजार ९७७ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०७ लाख ०७ हजार ९०८ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०८.०१ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १३ हजार ८०८ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.४० टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

    राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांनाचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ४९४ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०४ रुग्ण बाधित आढळले असून ४९० निरंक आढळले आहे.तर नगर येथे ५१२ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०५ तर अँटीजन तपासणीत ०४ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०६ असे एकूण अहवालात बरीच वाढ होऊन एकूण १५ रुग्ण बाधित आढळले आहे.तर २२ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.
    दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख २२ हजार ७११ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०६ हजार ६०७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०३ लाख ०९ हजार ३८६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ७१७ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.लग्न,दहावे,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास प्रारंभ केला आहे.त्यामुळे कोरोना रुग्ण ग्रामीण भागात बऱ्याच अंशी पुन्हा वाढु लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close