कोपरगाव तालुका
महसूल मंत्री थोरात यांचा वाढदिवस हा ‘गोहत्या दिन’ साजरा करायचा का ?-नगराध्यक्ष
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘बेरोजगार दिन’ साजरा करण्याचा पोरकटपणा युवक काँग्रेस करणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी जाहिर करून आपल्या पोरकटपणाचे जाहीर प्रदर्शन केले आहे.त्यावर उतारा म्हणून मग आम्ही संगमनेर शहरात ज्या प्रमाणात गोहत्या होत आहे ‘तो’ विचार करता आम्ही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस हा ‘गोहत्या दिन’ साजरा करायचा का ? असा तिखट सवाल कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी विचारला आहे.
“सत्यजित तांबे यांनी स्वतःकडे एकदा पाहून व अंतर्मुख होऊन भान ठेवायला हवे.असे कुणीही उठून एका आदर्श व्यक्तीच्या वाढदिवसाला असा आचरटपणा करायला लागले तर,यानंतर कुणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर मधील गोहत्याचे पातक पाहून “गोहत्या दिन” साजरा करू शकतात”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.
प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन तांबे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा बेरोजगार दिन म्हणून जाहीर करण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी त्या आवाहनाला उत्तर देताना एका प्रसिद्धी पत्रकान्वये हा समाचार घेतला आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात प्रत्येक वाढदिवस हा आनंदाचा दिवस असतो.भ्रष्टाचाराचा एकही डाग नसणाऱ्या नरेंद्र मोदींवरही टिका करायला,आंदोलन करायला हरकत नाही.पंतप्रधान झाल्यापासून विरोधक त्यांच्यावर पातळी सोडून टिका करतच आहेत.पण सत्यजित तांबे यांनी स्वतःकडे एकदा पाहून व अंतर्मुख होऊन जरा तरी भान ठेवायला हवे.असे कुणीही उठून एका आदर्श व्यक्तीच्या वाढदिवसाला असा आचरटपणा करायला लागले तर,यानंतर कुणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त “गोहत्या दिन” साजरा करू शकतात.कारण संगमनेरमध्ये वर्षानुवर्षे रात्रंदिवस हजारो गायींची हत्या होत आहे.गोहत्येला कायद्याने बंदी असतांना कॅबिनेट मंत्र्यांच्या गावात सर्रासपणे गायींची कत्तल होत आहे म्हणून तुमच्या नेत्यांचा वाढदिवस गोहत्या दिन म्हणून साजरा केला तर तुम्हाला कसे वाटेल ? याचा विचार करा.माझे म्हणणे चुकीचे आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तसे जाहिर करा.पंतप्रधान मोदीं विरुद्ध असे काही केल्याने तुम्हाला बढती मिळणार असेल तर आपला काही आक्षेप नाही असा शालजोडाही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी लगावला आहे.त्यामुळे तांबे यांची बोलती बंद करण्याची किमया साधल्याचे व मर्मावर नेमके बोट ठेवल्याचे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये बोलले जात आहे.