निधन वार्ता
सुहासिनी कोऱ्हाळकर यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील जुन्या पिढीतील प्रसिद्ध वकील कै.भालचंद्र कोऱ्हाळकर यांच्या धर्मपत्नी श्रीमती सुहासिनी कोऱ्हाळकर (वय-८५) यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्याच्या पच्छात रवींद्र कोऱ्हाळकर,संजय कोऱ्हाळकर,तसेच दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.
स्व.सुहासिनी कोऱ्हाळकर या अत्यन्त धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून प्रसिद्ध होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.