कोपरगाव तालुका
इंद्रधनुष्य योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा-डॉ. संतोष विधाते
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
राज्यातील बालकामधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना इंद्रधनुष्य योजनेत समावेश करून त्यांना लसीकरण करण्यात येणार आहे.तरी मातांनी आपल्या बालकांना या लसी देणे गरजेचे आहे.त्यानीं या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी जनशक्ती न्यूजशी बोलताना केले आहे.
नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, अर्धवट लसीकरण झालेली व लसीकरण न केलेली बालके ही पूर्ण लसीकरण केलेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. यासाठी केंद्र शासनाने माहे ऑक्टोबर 2017 मध्ये 187 जिल्ह्यात विशेष मिशन इंद्रधनुष्य (आयएमआय) कार्यक्रम हाती घेतला होता. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करण्यात येत आहे-डॉ.संतोष विधाते
राज्यात कोपरगावसह 7 ऑक्टोबरपासून पुढील चार महिन्यापर्यंत मिशन इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. या लसीकरणाने टाळता येणाऱ्या आजारामुळे बालमृत्यू होऊ नये व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी शासनाने हि मोहीम राज्यात हाती घेतली आहे.
नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, अर्धवट लसीकरण झालेली व लसीकरण न केलेली बालके ही पूर्ण लसीकरण केलेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. यासाठी केंद्र शासनाने माहे ऑक्टोबर 2017 मध्ये 187 जिल्ह्यात विशेष मिशन इंद्रधनुष्य (आयएमआय) कार्यक्रम हाती घेतला होता. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यात पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचे प्रमाण 65 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्याने ही मोहीम निवड केलेल्या जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. तरी मतांनी आपल्या बालकांना सदृढ आरोग्य लाभावे या साठी या लसीकरणाच्या लाभ घ्यावा असे आवाहनही डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी केले आहे.