कोपरगाव तालुका
दही आणि लाही या दोन्हीचे एकत्रीकरण म्हणजेच काला-भास्कर महाराज
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दही आणि लाही या दोन्हीचे एकत्रीकरण म्हणजे काला असून लाह्या किंवा चुरमुरे हे सर्व जीवाचे प्रतिक असुन त्यामध्ये ताक किंवा दही मिसळावे लागते.त्यामुळे सर्वजण एकत्र येत असल्याचे प्रतिपादन पढेगाव येथील ह.भ.प.भास्कर महाराज दाणे यांनी नुकतेच कोपरगाव येथील पढेगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“काला हा वेदांतील लोकांचा जीव ब्रम्ह ऐक्याचा असून हा वारकऱ्यांना विशेष मान्य नाही.कारण भेदाशिवाय प्रेम करता येत नाही.साधूसंत महात्मे हे अभेदातून प्रेमरसाकरीता भेदात आले.हा काला वैंकुठात आणि स्वर्गात होत नसुन केवळ मृत्यूलोकात होत असल्याने काल्याला महत्त्व आहे”-भास्कर महाराज दाणे.
कोपरगांव तालुक्यातील पढेगांव येथे सालाबादप्रमाणे श्रावणमासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या कालावधीत सातत्याने आठ दिवस कीर्तन,भजनाचे आयोजन करण्यात आले होते.आज सकाळी गंगागिरी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर ह.भ.प.भास्कर महाराज दाणे यांच्या कीर्तनसेवेने सप्ताहाची सांगता झाली आहे त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी नवोदित किर्तनकार नानासाहेब उसरे,अण्णासाहेब शिंदे ,सुभाष जगताप,दिगंबर वाघ,भगिरथ शिंदे,दिपक शिंदे,आदींसह बहुसंख्य भाविक उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”काला हा वेदांतील लोकांचा जीव ब्रम्ह ऐक्याचा असून हा वारकऱ्यांना विशेष मान्य नाही.कारण भेदाशिवाय प्रेम करता येत नाही.साधूसंत महात्मे हे अभेदातून प्रेमरसाकरीता भेदात आले.हा काला वैंकुठात आणि स्वर्गात होत नसुन केवळ मृत्यूलोकात होत असल्याने काल्याला महत्त्व आहे.स्वर्गातील देवताही त्यापासुन वंचित आहे.यासाठी वारकरी होऊनच काला मिळतो.”काल्याचिया असे देवजळी झाले मासे”देव माशाच्यारुपाने मृत्युलोकात येऊनही काला मिळाला नाही असेही सांगून त्यांनी अनेक कृष्ण लीला सांगितल्या आहेत.