कोपरगाव तालुका
पोहेगाव जि.प.गटात कोरोना रुग्णवाढ सुरूच,
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनीधी)
राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांनाचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५०६ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात १० रुग्ण बाधित आढळले असून ४९६ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ५६० स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०६ तर अँटीजन तपासणीत १० खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०६ असे एकूण अहवालात बरीच वाढ होऊन एकूण २२ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ३२ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.
तर आज कोपरगाव शहर व तालुक्यात एकाचाही मृत्यू नोंदवला गेला नाही.तथापि कोरोना रुग्णांत नैऋत्येकडील पोहेगाव जिल्हा परिषद गटात आजही रुग्णवाढ सुरूच राहिली असून एकट्या रांजणगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीत ०५ महिला ०१ पुरुष तर बहादरपूर हद्दीत एक पुरुष असे ०७ रुग्ण बाधित आढळले आहे.तर कोपरगाव शहर-सर्वाधिक-०९,त्या खालोखाल येसगाव व वारी येथील प्रत्येकी ०२ रुग्ण,टाकळी येथील ०१ रुग्ण तर खांडगाव येथील ०१ रुग्ण बाधित आढळले आहे.दरम्यान आज एक रुग्णाचे निधन झाले आहे मात्र त्याचे नाव उपलब्ध झाले नाही.
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १३ हजार ८१८ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १६९ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१५ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५६ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ६१ हजार ४६१ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०६ लाख ४५ हजार ८४४ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०८.५६ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १३ हजार ४३४ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.२२ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख ११ हजार ४२७ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार ९३७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ९९ हजार ९२८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ५६१ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.लग्न,दहावे,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास प्रारंभ केला आहे.त्यामुळे कोरोना रुग्ण बऱ्याच अंशी पुन्हा वाढु लागले आहेत. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव,जवळके,बहादरपूर,अंजनापूर,रांजणगाव देशमुख आदी ठिकाणी रुग्ण लक्षणीयरित्या ०८ रुग्ण वाढले आहे हि चिंतेची बाब आहे.याबाबत प्रशासनाला तातडीने पावले उचलावी लागणार आहेत.त्या दृष्टीने आरोग्य विभागाने हालचाली सुरु केल्या असून घरोघरी तपासणी मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे.