जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

केंद्रीय मंत्री राणेंच्या वक्तव्याचा कोपरगाव शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी सोमवारी आक्षेपार्ह विधान केल्याने मंगळवारी शिवसेना पक्षाच्या वतीने कोपरगांवात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने व हल्लाबोल करून निषेध नोंदवून कोपरगाव शहर पोलिस स्टेशन येथे राणेंच्या अटेकेसाठी निवेदन देण्यात आले आहे.

“मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना अमृतमहोत्सव हा शब्द आठवला नाही म्हणून नारायण राणेंची देशभक्ती जागृत झाली मग उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांच्या पार्थिवावर असलेल्या भारताच्या झेंड्यावर भाजपचा झेंडा टाकला गेला तेव्हा ह्यांची देशभक्ती कुठे गेली होती”राजेंद्र झावरे,अध्यक्ष उत्तर नगर जिल्हा शिवसेना.

निवेदनात म्हटले आहे की,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकारांशी वार्तालाप करतांना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या विषयी जीभ घसरवून एकेरी भाषेत वक्तव्य केल्याने आम्हा शिवसैनिकांचे भावना दुखावल्या आहेत.हे वक्तव्य अशोभनीय असून लोकशाहीच्या विरोधात आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची जाहीर माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी तीव्र व एकमुखी मागणी करून यापुढे असले प्रकार खपवून घेणार नाही असा इशाराही दिले आहे.
या वेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले की,”मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना अमृतमहोत्सव हा शब्द आठवला नाही म्हणून नारायण राणेंची देशभक्ती जागृत झाली मग उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांच्या पार्थिवावर असलेल्या भारताच्या झेंड्यावर भाजपचा झेंडा टाकला गेला तेव्हा ह्यांची देशभक्ती कुठे गेली होती.निदर्शने करतांना व निवेदन देतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,विधानसभा संघटक अस्लम शेख,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल,महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे,वहातूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,तालुकाप्रमुख विमलताई पुंडे,बाळासाहेब जाधव,वाहतूकसेना उपजिल्हाप्रमुख, उपशहरप्रमुख विकास शर्मा,भुषण पाटणकर,आकाश कानडे,संघटक बाळासाहेब साळुंके,व्यापारी सेनेचे योगेश मोरे,वैभव गिते,राहूल देशपांडे,सतिष शिंगाणे,विभागप्रमुख समीर शेख,गौरव गुप्ता, वैभव हलवाई,वाहतूकसेनेचे अविनाश धोक्रट,पप्पू पेकळे,प्रविण शेलार,किरण आडांगळे,सचिन जाधव,दत्तू लोणारी,संतोष लोणारी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close