जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीस पळविले,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील वायव्येस साधारण दहा कि.मी.अंतरावरील सोनारी ग्रामपंचायत हद्दीतील एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने अज्ञात कारणाने पळवून नेले असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी गायब मुलीच्या ४५ वर्षीय पित्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

खेळण्या-बागडण्याच्या,शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत.कोवळ्या वयात घरून पळून जाण्याचे,संसार थाटण्याचे स्वप्न बघत असल्याचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत.चित्रपट,भ्रमणध्वनीच्या वापराचा व त्या वरील अनियंत्रित चित्रपटांचा विपरीत परिणाम,तरुण पिढीवर मोठ्या प्रमाणावर होत असून परिणामस्वरूप अल्पवयीन मुली या मुलींच्या शोधात असलेल्या तरुणांच्या जाळ्यात अलगतपणे पडत असून अशा घटना राज्यात मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहे.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही.

चोरी-दरोड्याप्रमाणे आता अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या वाढत्या घटना पालक आणि पोलिसांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत.अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून,फूस लावून पळवून नेण्याच्या दररोज किमान चार घटना मुंबईसह राज्याच्या विविध भागात घडत आहेत.विशेष म्हणजे या अपहरणांमध्ये परिचयातील किंवा परिसरातील तरुणांचा समावेश सर्वाअधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.खेळण्या-बागडण्याच्या,शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत.कोवळ्या वयात घरून पळून जाण्याचे,संसार थाटण्याचे स्वप्न बघत असल्याचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत.चित्रपट,भ्रमणध्वनीच्या वापराचा व त्या वरील अनियंत्रित चित्रपटांचा विपरीत परिणाम,तरुण पिढीवर मोठ्या प्रमाणावर होत असून परिणामस्वरूप अल्पवयीन मुली या मुलींच्या शोधात असलेल्या तरुणांच्या जाळ्यात अलगतपणे पडत असून अशा घटना राज्यात मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहे.त्याला कोपरगाव शहर आणि तालुकाही अपवाद नाही.कोपरगाव तालुक्यात अशी घटना नुकतीच सोनारी ग्रामपंचायत हद्दीत घडली असून एका चौदा वर्षीय मुलीस एका अज्ञात इसमाने शुक्रवार दि.२० ऑगष्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पळवुन नेले असल्याचा संशय आहे.

याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मुलीच्या पित्याने तो दाखल केला आहे.या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की,”आपली मुलगी वरील तारखेस व वेळी आपल्याला,”मी,संडासला जाते”,असे सांगून जे गेली ती परत आलीच नाही.त्यामुळे पालक इकडे तिकडे नातेवाईक व जवळच्या इसमांकडे पाहून ‘ती’ मिळून न आल्याने त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.एम.आंधळे हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close