गुन्हे विषयक
कोपरगाव नजीक दुचाकिस अपघात,महिला ठार
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या पूर्वेस हाकेच्या अंतरावर असलेल्या नगर-मनमाड राज्य मार्गावर असलेल्या व गोदावरी नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावर आज दुपारी ०३ वाजेच्या सुमारास आपल्या देशमाने ता.येवला येथील माहेराहून आपले रक्षाबंधन आटोपून आपल्या भावाबरोबर परत आपल्या मालुंजे खुर्द ता.श्रीरामपूर येथील सासरी जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या राजस्थान येथील कंटेनरने (क्रं.आर.जे.०६,जी.सी.७८११) दिलेल्या धडकेत मागील बाजूस बसलेली नवविवाहित महिला प्रियांका सचिन सोळंके (वय-अंदाजे १९) ठार झाली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आपले माहेर असलेल्या येवला तालुक्यातील संबंधित महिला प्रियंका सचिन सोळंके हिचे नुकतेच चार महिन्यांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजे खुर्द येथील मुलाशी लग्न झाले होते.मात्र नुकतीच २० ऑगष्ट रोजी राखी पौर्णिमा सण साजरा झाला असून त्यासाठी संबधीत महिला हि माहेरी आली होती.तिला पोहचविण्यासाठी आज तिचा भाऊ (नाव उपलब्ध झाले नाही) आपल्या दुचाकीवर घेऊन चालला असताना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या अवजड कन्टेनरने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली त्यात या महिलेचे निधन झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,आपले माहेर असलेल्या येवला तालुक्यातील संबंधित महिला प्रियंका सचिन सोळंके हिचे नुकतेच चार महिन्यांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजे खुर्द येथील मुलाशी लग्न झाले होते.मात्र नुकतीच २० ऑगष्ट रोजी राखी पौर्णिमा सण साजरा झाला असून त्यासाठी संबधीत महिला हि माहेरी आली होती.तिला पोहचविण्यासाठी आज तिचा भाऊ (नाव उपलब्ध झाले नाही) आपल्या दुचाकीवर घेऊन चालला असताना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या अवजड कन्टेनरने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली.त्यात सम्बधित महिला जागीच ठार झाली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनेनंतर कंटेनर चालक फरार झाला आहे.या दुर्घटनेस पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दुजोरा दिला आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस करत आहेत.