जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

योगाभ्यासाने ताण-तणाव दूर करता येतो-राजेंद्र हुंडेकर

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

योगाभ्यास ही आजची गरज आहे. रोजच्या यंत्रवत जगण्याने व रसायनयुक्त जेवणातून गंभीर स्वरूपाच्या आजारांचा सामना व्यक्तीला करावा लागत आहे त्यातूनच ताण-तणाव वाढत असल्याने योगाभ्यासाने ताण-तणाव दूर करता येत असल्याचे प्रतिपादन योगप्रकाश संस्थेचे प्रमुख राजेंद्र हुंडेकर यांनी कोपरगाव येथिल कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.

ध्यान धारणा म्हणजे शांत बसण्याची अवस्था असून ही सरळ सोपी साधना नव्हे, त्यासाठी जाणीवपूर्वक योगाभ्यास करणे करिता विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे विचारशक्ती सर्वात मोठी असून मध्यम वर्ग नेहमी ताण-तणावात राहात असल्याने त्यांची कार्यशक्ती घटली आहे त्यातून परिवार,समाज किंबहुना देशाचे नुकसान होत असल्याने ताणाचे व्यवस्थापन करण्याचे ज्ञान अवगत करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयात प्राध्यापक विद्या प्रबोधिनीच्या वतीने नुकतीच “व्यवसायातील तानावमुक्ती ” या विषयावर व्याख्यानमाला आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘व्यवसायातील तणाव मुक्ती’ हा होता.त्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे हे होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,” ध्यान धारणा म्हणजे शांत बसण्याची अवस्था असून ही सरळ सोपी साधना नव्हे, त्यासाठी जाणीवपूर्वक योगाभ्यास करणे करिता विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे विचारशक्ती सर्वात मोठी असून मध्यम वर्ग नेहमी ताण-तणावात राहात असल्याने त्यांची कार्यशक्ती घटली आहे त्यातून परिवार,समाज किंबहुना देशाचे नुकसान होत असल्याने ताणाचे व्यवस्थापन करण्याचे ज्ञान अवगत करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे यांनी ताण तणाव हे प्रगतीचे मूळ असल्याने सर्व जबाबदारीचे योग्य नियोजन झाले तरच ताण-तणाव दूर करता येत असल्याचा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक विद्याप्रबोधिनीचे अध्यक्ष व विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ.आर.जी.पवार यांनी केले. व आभार डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी मानले. या प्रसंगी उपप्राचार्य प्रा.रमेश झरेकर,डॉ.विजय निकम तसेच सर्व प्राध्यापक-शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close