नगर जिल्हा
श्रीरामपुरात दुचाकी चोरणारे अटकेत
संपादक-नानासाहेब जवरे
श्रीरामपुर शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरू आहे, अशातच दुचाकी चोरी करणाऱ्या चोरांचा शोध लावण्यास श्रीरामपूर पोलिसांना यश आले आहे.पोलिसांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संजीवन हॉस्पिटल मध्ये कार्यरत असलेल्या डॉ. वर्षाराणी धनंजय भिसे यांनी पांढऱ्या रंगाची फाईव्ह जी होंडा ऍक्टिव्हा क्रमांक एम एच १७ सी जी ३०६२ हि दुचाकी हॉस्पिटल समोर लावलेली होती. दि १९ नोव्हेंबर रोजी सकाळी सदर गाडी अज्ञात चोरट्यानी चोरून नेली.याबाबत डॉ. भिसे यांनी पोलिसात या बाबत गुन्हा दाखल केला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,येथील संजीवन हॉस्पिटल मध्ये कार्यरत असलेल्या डॉ. वर्षाराणी धनंजय भिसे यांनी पांढऱ्या रंगाची फाईव्ह जी होंडा ऍक्टिव्हा क्रमांक एम एच १७ सी जी ३०६२ हि दुचाकी हॉस्पिटल समोर लावलेली होती. दि १९ नोव्हेंबर रोजी सकाळी सदर गाडी अज्ञात चोरट्यानी चोरून नेली.याबाबत डॉ. भिसे यांनी पोलिसात या बाबत गुन्हा दाखल केला होता. याबाबत श्रीरामपूर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती.पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट,जालिंदर लोंढे, साईनाथ राशीनकर, सोमनाथ वाडेकर,संजय दुधाडे, सुनील दिघे,पंकज गोसावी,महेंद्र पवार,हरिश पानसंबळ, किशोर जाधव,अर्जुन पोकळे,रमिजराजा अत्तार आदींच्या पथकाने विशाल अशोक गायकवाड (वय १८ ),आकाश लक्ष्मण गांगुर्डे (वय १९),संजयनगर,वॉर्ड नंबर दोन,श्रीरामपुर यांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता,सदर आरोपीनी नगर येथूनही कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एम एच १६,सी एल ६८०६ क्रमांकाची टिव्हीएस ज्युपिटर गाडी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्हीही गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून अजून काही दुचाकी चोरल्या का ? याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.