जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यातील…त्या चोरीचा ऐवज जप्त

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले छायाचित्रकार विजय सुनील गोल्हार यांचे ‘हिंदवी फोटोग्राफी’ या दुकानांचा मागील दरवाजा तोडून आतील सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी अज्ञातच चोरट्याविरुद्ध शोधमोहीम राबवून दहिगाव बोलका शिवाजीनगर येथील आरोपी रणजित शामलाल मुळेकर (वय-२४) व संतोष शामलाल यादव (वय-४०) यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून वरील किमतीचा संगणक व प्रिंटर असा ऐवज जप्त केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुका पोलिसांचे सर्वत्र कौतुल होत आहे.

कोपरगाव तालुक्यातील पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत घडली फिर्यादी विजय गोल्हार यांचे ‘हिंदवी फोटोग्राफी’ नावाचे छायाचित्रकारीचे दुकान होते.त्यांच्या दुकानावर पाळत घेऊन अज्ञातच चोरट्याने दुकानांचे मागील दरवाजाचे कुलूप तोडून दि.७ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्रीच्या सुमारास आतील ३० हजार रुपये किमतीचा संगणक,त्यास एच.पी.कंपनीचा २४ इंची स्क्रीन असलेला सी.पी.यू. त्यास ८ जी.बी.रँप, दोन हार्ड डीक्स ग्राफिक्स कार्ड्स,असलेला जुना वापरता.तर २० हजार रुपये किमतीचा एफसोन कंपनीचा प्रिंटर असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता त्यातील आरोपी अटक करून त्यांच्याकडील ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात धूनमधूनच भुरटे चोरटे आपले डोके वर काढत असून त्यांचा उपद्रव तालुका पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे.अशीच घटना नुकतीच पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत घडली असून त्या ठिकाणी फिर्यादी विजय गोल्हार यांचे ‘हिंदवी फोटोग्राफी’ नावाचे छायाचित्रकारीचे दुकान आहे.त्यांच्या दुकानावर पाळत घेऊन अज्ञातच चोरट्याने दुकानांचे मागील दरवाजाचे कुलूप तोडून दि.७ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्रीच्या सुमारास आतील ३० हजार रुपये किमतीचा संगणक,त्यास एच.पी.कंपनीचा २४ इंची स्क्रीन असलेला सी.पी.यू. त्यास ८ जी.बी.रँप, दोन हार्ड डीक्स ग्राफिक्स कार्ड्स,असलेला जुना वापरता.तर २० हजार रुपये किमतीचा एफसोन कंपनीचा प्रिंटर असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.

या प्रकरणी फिर्यादी गोल्हार यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातच चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.घटनास्थळी प्रभारी पोलीस अधिकारी सुरेश आव्हाड यांनी भेट दिली होती.कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४४३/२०२२ भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.पुढील प्रभारी पोलीस निरीक्षक आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सी.बी.काळे हे करीत असताना त्यांना गुप्त खबऱ्या मार्फत वरील दहिगाव बोलका येथील दोन आरोपींची माहिती मिळाली होती.त्यानुसार त्यांच्यावर पाळत ठेवून तालुका पोलिसांनी त्यांना गजाआड केले होते.त्यांना पोलिसी हिसका दाखवला असता त्यांनी गुन्हा कबुल केला होता.पोलिसांनी त्यांच्याकडून वरील ऐवज जप्त करून आरोपींना कोपरगाव येथील न्यायालयात दाखल केले होते.न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.त्याबाबत न्यायालयात कारवाई सुरू आहे.

दरम्यान या पोलिसी कारवाईत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पो.कॉ.इरफान शेख,ए.आर.वाखुरे यांनी मोलाची भूमिका निभावली होती.त्यांचे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी कौतुक केले आहे.

दरम्यान या यशाबद्दल नगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचा नुकताच गौरव केला आहे.त्यावेळी श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर,शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close