जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

माजी सरपंच गणपत पाचोरे यांना पत्नीशोक

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणपत पाचोरे यांच्या धर्मपत्नी कमलबाई पाचोरे (वय-55)यांचे काल सकाळी दहा वाजेच्या सुमारास बहादराबाद शिवारात कोपरगाव-संगमनेर मार्गावर सुमारास रस्ता अपघातात निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पती दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.

स्व.कमलबाई पाचोरे या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून शहापूर व परिसरात प्रसिद्ध होत्या.त्यांना उपचारार्थ मुलाने दुचाकीवर घरून जात असताना बहादराबाद शिवारात हि दुर्घटना घडली होती.त्यांच्यावर बुधवार दि.20 नोव्हेम्बर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास शहापूर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या निधनाने शहापूर व परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close