कोपरगाव तालुका
पुष्पा घारे यांचे निधन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी व प्रगतशील शेतकरी नवनाथ घारे यांच्या धर्मपत्नी पुष्पा नवनाथ घारे (वय-40)यांचे नुकतेच दीर्घ आजाराने तांबेवाडी येथे निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पती,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.
स्व.पुष्पा घारे या अत्यंत मनमिळाऊ म्हणून शहापूर व परिसरात परिचित होत्या. या अनेक दिवसांपासून आजारी होत्या त्यांच्यावर कोल्हार नजीक असलेल्या तांबेवाडी येथे औषोधोपचार सुरु होते.मात्र त्यांच्यांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना वाचविण्यात यश आले नाही.त्यांच्यावर आज दुपारी तिनच्या सुमारास शहापूर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या निधनाने शहापूर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.