जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आधी आपली संस्कृती तपासण्याची गरज-या कार्यकर्त्यांचा युवराजास रोख आहेर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
सुसंस्कृतपणा आपल्यालाच माहित नसल्यामुळे आपले कार्यकर्ते मद्यधुंद होवून हॉटेल मालक,महिलांना दमबाजी करून हॉटेलवर जाऊन राडा करतात.त्यामुळे आपण अगोदर आपल्या कार्यकर्त्यांना संस्कृतीचे धडे द्यावेत असा रोख आहेर राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांना नुकताच दिला आहे.

विवेक कोल्हे यांच्या भाजपा युवा मोर्चाच्या शहरउपाध्यक्षाने नगर-मनमाड महामार्गावरील एका प्रसिद्ध हॉटेलवर मद्याच्या नशेत हॉटेल मालक,महिलांना दमबाजी करत चांगलाच राडा केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.त्यामुळे आपल्याच नेत्याचे दात त्यांच्या घशात घातल्यामुळे हा तालुक्यात उलटसुलट चर्चेचा विषय ठरला आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या नूतन उपनगराध्यक्षाच्या गळ्यात हार घालून त्याच्या सत्काराप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी आ.आशुतोष काळे याना उद्देशून भर चौकात येवून ठोकून काढण्याची सुसंकृत नेत्याच्या वारसाची भाषा नाही असे वक्तव्य केले होते.या बातमीचे वृत्त प्रसारित होत नाही तोच विवेक कोल्हे यांच्या भाजपा युवा मोर्चाच्या शहरउपाध्यक्षाने नगर-मनमाड महामार्गावरील एका प्रसिद्ध हॉटेलवर मद्याच्या नशेत हॉटेल मालक,महिलांना दमबाजी करत चांगलाच राडा केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.त्यामुळे आपल्याच नेत्याचे दात त्यांच्या घशात घातल्यामुळे हा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.परिणामस्वरूप लोकास ब्रम्हज्ञान सांगणाऱ्या या युवराजांची चांगलीच पाचावर धारण बसली आहे.भाजपा युवा मोर्चाच्या उपशहराध्यक्षपदी निवड झालेला आनंद साजरा करण्यासाठी व आषाढ महिना संपत आल्यामुळे एक दिवस अगोदरच गटारी साजरी करण्यासाठी गेलेल्या कोल्हेंच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच राडा घातला.त्यामुळे भाजपा युवा मोर्चाचा उपशहराध्यक्ष सुनील बाळासाहेब पांडे व त्याच्या सोबत असलेल्या काही भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गु. र. नं. २४८/२१ भा. द. वि. कलम ३५३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नवाज कुरेशी यांनी विवेक कोल्हे यांना हा रोख आहेर प्रदान केला आहे.

ते म्हणाले की, कोपरगाव तालुक्याच्या राजकारणाची संस्कृती काय आहे हे आ.काळे यांना चांगलेच माहित आहे.मात्र ज्यांना कोपरगाव तालुक्याच्या आदर्श राजकारणाची संस्कृती माहित नाही त्यांनी अगोदर माजी खा. कर्मवीर शंकरराव काळे-व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचेकडून संस्कृतीचे धडे घ्यावेत व त्यातून आपल्या कार्यकर्त्यांना देखील थोडीसी संस्कुती शिकवावी.परिणामस्वरूप आपल्याला यापुढे खाली मान घालण्याची वेळ येणार नाही. आ.काळे हे प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देतात. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला जर कुणी दमबाजी करीत असेल तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे स्वाभाविक आहे.म्हातारी मेल्याचं दु:ख नाही,मात्र काळ सोकावू नये हा त्यामागचा उद्देश आहे. मात्र त्याचा कुणी अर्थ काढून उपदेशाचे धडे देणे निश्चितपणे चुकीचे आहे. ते पण ज्यांचे कार्यकर्ते महिला भगिनींना दमबाजी करतात त्यांनी तर अजिबात उपदेशाचे डोस देवू नयेत. राहिला प्रश्न विकासाचा तर मतदार संघाच्या विकासाची जबाबदारी आ. काळे यांनी घेतलेली असून तालुक्याचा विकास करण्यासाठी ते सक्षम आहेत.ज्यावेळी आपल्याला विकास करण्यासाठी संधी मिळाली त्यावेळी आपण विकास करू शकला नाही. त्यावेळी आपल्याकडून विकास होवू शकला नसल्यामुळे बैल गेला आणि झोपा केला अशी आपली परिस्थिती झाली आहे. व आता आ.काळे कोरोनाच्या संकटात देखील मतदार संघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणत असतांना आपण त्यांच्या नावाने उगाचच खडे फोडत आहात हे जनता जाणून आहे.त्यामुळे कोणतेही विधान करतांना अगोदर आपले कार्यकर्ते काय करतात ते तपासून पहा. उपदेशाचे धडे अगोदर आपल्याच कार्यकर्त्याना द्या असा सल्ला नवाज कुरेशी यांनी या युवराजास शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close