शैक्षणिक
पाचव्या वर्षी कोपरगावच्या समता स्कुलचा निकाल लक्षवेधी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव– सी.बी.एस. ई.चा २०२०-२१ चा इयत्ता १०वी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात कोपरगाव नजीक असललेल्या समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थांनी अहमदनगर जिल्ह्यात बाजी मारत अविक शिवांकर मंडल याने ९८ टक्के गुण मिळवुन स्कूल मध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर पूर्वा सचिन कोठारी हिने ९७.०८ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमाक तर समृद्धी विष्णु दावभट हिने ९७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला असून शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली. मंडळाच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने दहावीची संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी यंदा एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ९ लाख ९ हजार ९३१ विद्यार्थी तर ७ लाख ४८ हजार ६९३ विद्यार्थिनी होत्या.त्याचा निकाल नुकताच हाती आला आहे.त्यात समता स्कुलच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची दहावीच्या परीक्षा रद्द करून, सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दिली आहे.दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली. मंडळाच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने दहावीची संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी यंदा एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ९ लाख ९ हजार ९३१ विद्यार्थी तर ७ लाख ४८ हजार ६९३ विद्यार्थिनी होत्या.त्याचा निकाल नुकताच हाती आला आहे.त्यात समता स्कुलचाही समावेश आहे.
समता स्कूल मधील ५ विद्यार्थी ९५ टक्के च्या पुढे गुण मिळवुन उत्तीर्ण झाले आहे.त्यामध्ये अविक मंडल,पूर्वा कोठारी,समृद्धी दावभट,मेधा शहा,पौरवी रहाणे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ८० ते ९० टक्के च्या दरम्यान गुण मिळविणारे ४२ विद्यार्थी असून इंग्रजी विषयात अविक मंडल, पूर्वा कोठारी, रुजुल रोहमारे, यांनी १०० पैकी ९७ गुण मिळविले, हिंदी विषयात समृद्धी दावभट हिने १०० पैकी १०० गुण मिळविले आहे. गणित विषयात अविक मंडल, पूर्वा कोठारी, मेधा शहा यांनी १०० पैकी ९९ गुण मिळविले. विज्ञान विषयात अविक मंडल १०० पैकी ९७ गुण तर समाजशास्त्र या विषयात पूर्वा कोठारी हिने १०० पैकी ९९ गुण मिळविले आहे.निधीशा आव्हाड,सिद्धी शिंगी,श्रेया आढाव,तनिषा लुटे,स्नेहल पाटील,दिग्विजय ताडगे,अंजली भामरे,श्रेयस भोसले, वंश चावला,अदिती पटारे, तुलसी न्याती,नक्षत्र ठाणगे, तन्वी वाबळे,नेहा मुंजे, तन्वी लालसरे, रुजुल रोहमारे, रुपेश डहाळे, निष्ठा भुसारी, अद्वैत मापारी, सुचिता पवार,अक्षत ठोळे,अभिनंदन बंगाळ,अथर्व भाकरे या विद्यार्थ्यानी ९० टक्के च्या पुढे गुण मिळवत यश संपादन केले आहे.
‘समता इंटरनॅशनल स्कूल सलग ५ व्या वर्षात जिल्ह्यात अग्रगण्य राहण्याची परंपरा राखत पुनः एकदा समता वाटचाल यशस्वी ठरली आहे.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,स्वाती कोयटे,मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे,व्यवस्थापन समितीचे सदस्य,शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन,उपप्राचार्य समीर अत्तार,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.