कोपरगाव तालुका
कोपरगावात उद्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रम
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
भारत सरकारचे मानावविकास मंत्रालय व हिंदी नीदेशालय प्रकाशन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरातील संजयनगर येथील गवारे मामा फौंडेशन यांच्या सभागृहात पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम नवी दिल्ली येथील हिंदी निदेशालयाच्या निर्देशक श्रीमती अनिता डगोरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.तरी या कार्यक्रमाचा कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन हिंदी अध्यापक सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पगारे यांनी केले आहे.
भारत सरकारच्या हिंदी निदेशालयाच्या म्हणण्यानुसार भारत हा खंडप्राय देश असून या देशात अनेक भाषा बोलल्या जातात मात्र देशातील सर्व जनतेला आपला संवाद साधण्यासाठी हिंदीसारख्या प्रभावी भाषेची गरज आहे.आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त हिंदी भाषेचे ज्ञान असेल तर परदेशांत जाताना माणसाला कुठल्याही अडचणींचा सहज सामना करता येतो.
भारत सरकारच्या हिंदी निदेशालयाच्या म्हणण्यानुसार भारत हा खंडप्राय देश असून या देशात अनेक भाषा बोलल्या जातात मात्र देशातील सर्व जनतेला आपला संवाद साधण्यासाठी हिंदीसारख्या प्रभावी भाषेची गरज आहे.आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त हिंदी भाषेचे ज्ञान असेल तर परदेशांत जाताना माणसाला कुठल्याही अडचणींचा सहज सामना करता येतो.हि बाब हेरून हिंदी निदेशालयाने देशभर प्रदर्शन लावण्याचा स्तुत्य उपक्रम सुरु केला असून कोपरगावकर नागरिकांना हिंदी बरोबरच अन्य भाषेची ओळख करण्यासाठी या पुस्तक प्रदर्शनाचा चांगला उपयोग होणार आहे.
हे प्रदर्शन रविवार दि.17 नोव्हेबर पासून सुरु होणार असून ते गुरुवार दि.21 नोव्हेंबर पर्यंत सकाळी दहा वाजे पासून ते सायंकाळी आठ वाजे पर्यंत सुरु राहणार आहे.तरी हिंदी भाषाप्रेमी नागरिकांनी या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सचिव सुरेश गोरे,सहसचिव एकनाथ जाधव यांनी शेवटी केले आहे.