जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

माजी आ.कोल्हे यांनी साप-साप म्हणून भुई बडविण्याचे उद्योग बंद करावे-नगराध्यक्ष

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील खुल्या नाट्यगृहाचा निधी जागेअभावी परत जात असताना आपण तो परत न करता तो प्रशासकीय इमारतीसाठी वापरला आहे.यात जागा न मिळण्यास माजी आ.स्नेहलता कोल्हे याच कारणीभूत असून त्यांनी,”साप-साप म्हणून भुई बडविण्याचे उद्योग” आता नैराश्येतून बंद करावे व जनतेने आपल्या नाठाळपणाला नगरपरिषद व विधानसभा या दोन्ही ठिकाणी नाकारले असल्याचे वास्तव मोठ्या मनाने कबुल करावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवये नुकतेच केले आहे.

“आपण जलसंपदा विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनही उपयोग झाला नाही.नगरविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा करूनही यश मिळाले नाही.कारण उजेडात निधी दिला म्हणणाऱ्यांनी अंधारात त्या कामाला आपल्या राजकीय व उज्वल (!) परंपरेप्रमाणे खो घातला.अखेर वास्तव मान्य करून आपण नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना भेटून ‘तो’ निधी नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीकडे वळविण्याचा निर्णय घेतला व निधी वळवला हे उघड बातम्या देऊन जनतेच्या निदर्शनास आणले आहे”-विजय वहाडणे,अध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

प्रथम कोपरगाव नगरपरिषद व त्या नंतर तीन वर्षांनी संपन्न झालेल्या निवडणुकात भाजपमध्ये पावन करून घेतलेल्या माजी आ.स्नेहलता कोल्हे गटाचा दणदणीत पराभव झाला.याला आता बरीच वर्ष उलटून गेली मात्र माजी आ.कोल्हे गटाचा ..तो ताप अद्याप उतरलेला दिसत नाही.त्यातून त्यांना नैराश्येने घेरलेले दिसत असून त्यांनी आ.आशुतोष काळे व कोपरगाव नगरपरिषेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्यावर आगामी नगरपरिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन असंबद्ध आरोपाचे सत्र सुरु केले आहे.त्याला नुकतेच नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी उत्तर दिले आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”कोपरगावात बंदिस्त नाट्यगृह व्हावे यासाठी आपण अनेक वेळा माजी मंत्री विनोद तावडे यांना भेटून निधीची मागणी केली.दि.२० नोव्हेंबर २०१७ ला ०२ कोटी रुपयांचा वैशीष्ट्यपूर्ण निधी मंजूर झाला.त्यासाठी सर्वे.न.२३७ मधील ४० आर जागा बंदिस्त नाट्यगृहासाठी मिळावी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेने दि.१७ जानेवारी २०१८ व १० ऑगष्ट २०१८ ला कार्यकारी अभियंता,नाशिक पाटबंधारे विभाग यांचेकडे केली.तसा ठराव नगरपरिषदेने पास केला मात्र ति जागा पालिकेला मिळू शकली नाही.त्यांला कारण नगरपरिषदेला न पेलवणारा सुमारे दीड कोटींचा भाडेपट्टा मागितला तो पालिकेला देणे शक्य नव्हते.तो नाममात्र असावा अशी मागणी आपण केली तो अखेर त्यांनी सुमारे पस्तीस लाखांवर आणला मात्र तो किमान भाडेपट्टाही पालिकेच्या आवाक्यात नव्हता हे खरे वास्तव.त्या बाबत आपण तत्कालीन आ.स्नेहलता कोल्हे यांना लक्ष घालण्याची विनंती केली मात्र त्या वेळी त्यांनी सोयीस्कर कानाडोळा केला.कारण हे काम नगराध्यक्ष वहाडणे यांच्या काळात होऊ नये यासाठी कुटील डाव केला.व नाट्यगृहाचा बातम्या प्रसिद्धी करून श्रेय मिळवून वहाडणे यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले हे कोपरगावातील जनतेपासून लपून राहीले नाही.आपण जलसंपदा विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनही उपयोग झाला नाही.नगरविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा करूनही यश मिळाले नाही.कारण उजेडात निधी दिला म्हणणाऱ्यांनी अंधारात त्या कामाला आपल्या राजकीय व उज्वल (!) परंपरेप्रमाणे खो घातला.अखेर वास्तव मान्य करून आपण नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना भेटून ‘तो’ निधी नगरपालिकेच्या प्रशासंकीय इमारतीकडे वळविण्याचा निर्णय घेतला व निधी वळवला हे उघड बातम्या देऊन जनतेच्या निदर्शनास आणले आहे.भाडेपट्टा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडून त्यावेळी झोपेचे सोंग घेणाऱ्या माजी आ.कोल्हेनां आता पालिका निवडणुका तोंडावर आल्यावर आपल्या राजकीय सोयीसाठी विकास आठवला आहे. हे खरे वास्तव आहे.त्यासाठी जिज्ञासूंनी आपल्याकडे असलेला पत्रव्यवहार जरूर पाहावा असे आवाहनही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close