जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नगरपरिषदेत सेनेचा राडा,नगरपरिषदेची तोडफोड,सात जण अटक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव नगर परिषदेत आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील पूनम चित्रपट गृहासमोरील आरोपींचे अवैध टपरीचे अतिक्रमण रात्रीच्या सुमारास नगरपरिषदेने काढल्याचा राग मनांत धरून शिवनेनेचे माजी शहराध्यक्ष सनी रमेश वाघ,माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक योगेश बागुल,उपजिल्हा प्रमुख कैलास द्वारकानाथ जाधव,बालाजी पंढरीनाथ गोर्डे,साई पंढरीनाथ गोर्डे,निलेश पंढरीनाथ गोर्डे,आशिष शेळके आदीनीं बेकायदा जमाव करून,जमाव बंदीचे उल्लंघन करून कोपरगाव नगरपरिषदेत जाऊन अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून कार्यालयातील वस्तूंची तोडफोड केल्या प्रकरणी आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सात जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधीने सेनेचे माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांचेशी भ्रमणध्वनिवरून संपर्क साधला असता त्यांचा तो बंद आढळला आहे.तथापि त्यांनी,समाज माध्यमात मुलाखत दिलेल्या व फिरणाऱ्या चलचित्रणात म्हटलं आहे की,”संबंधित ठिकाणी अतिक्रमण नव्हते तर त्या जागेचा करार झालेला होता असा दावा केला असून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा असल्याचा दावा केला आहे”.त्यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेने आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे आदेशाने मार्च २०१० मध्ये शहरातील सुमारे २ हजाराहून अधिक अवैध व्यावसायिकांची अतिक्रमणे हटवली होती.त्यानंतर गत दहा वर्षाहून अधिक काळ या प्रश्नावर विविध पक्षांचे शहरातील मतपेटीचे राजकारण सुरु आहे.ते अद्याप संपण्याची चिन्हे नाही.उलट याला नगरपरिषद निवडणूक जवळ आली की आणखी शिळ्या कढीला उधाण येते.आजही अशीच घटना घडली असून कोपरगाव नगरपरिषदेने पूनम चित्रपट गृहासमोरील अतिक्रमण काढलेले असताना त्याच ठिकाणी वरील काही आरोपीनी पुन्हा त्याच ठिकाणी आपले दुकान मांडण्याचा प्रयत्न केला असता.त्याला नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हरकत घेतली व त्या विरोधात कारवाई करून ते अतिक्रमण रात्रीच्या सुमारास मुख्याधिकारी डोईफोडे यांच्या आदेशाने काढून टाकले आहे.त्याचा राग मनात धरून वरील आरोपीनी आज नगरपरिषदेत सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जाऊन तेथील उपमुख्याधिकारी व शहर बांधकाम अभियंता दिगंबर वाघ यांच्या दालनात जाऊन शिवीगाळ तर काहींना मारहाण केली तर तेथील साहित्याची मोडतोड केली आहे.

दरम्यान आमच्या प्रतिनिधीने या बाबत फिर्यादी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांचेशी संपर्क साधला असता त्यांना बोलते केला असता त्यांनी,”कोपरगाव नगरपरीषदेने रितसर पोलीस बंदोबस्तात मुख्याधिकारी डोईफोडे यांच्या आदेशाने अतिक्रमण काढले असून ते बेकायदा होते असे म्हटले आहे.शिवाय त्या ठिकाणी कोणत्याही राष्ट्रपुरुषाच्या वा नेत्याच्या प्रतिमा नव्हत्या.त्या बाबत आमच्याकडे चलचित्रण फिती पुरावा म्हणून आहे.ते कोणीही पाहू शकते.

या प्रकरणी फिर्यादी सुनील भाऊसाहेब गोर्डे यांनी या प्रकरणी वरील सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान आमच्या प्रतिनिधीने या बाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी,”वरील सर्व आरोपी अटक करून ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल व कोणाचीही गय केली जाणार नाही”असे आश्वासन दिले आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२२९/२०२१ भा.द.वि.कलम ३५३,३३२,१८९,३२३,४२७,१२०(ब),१८८,२६९,२७०,१४३१४७,१४९,सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम १९८४ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close