कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील…या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची प्रभात फेरी

न्यूजसेवा
गोधेगाव -(वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव इंग्लिश स्कूल या महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गुरुवारी दिनांक ११ ऑगष्ट रोजी विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मीठाचा सत्याग्रह हा निर्णायक क्षणा पैकी एक आहे.याला दांडी यात्रा म्हणून इतिहासात उल्लेख केला जातो.याच घटनेला ९१ वर्ष होत आहेत.याच वेळी देशाचा अमृत महोत्सवही साजरा केला जात आहे.स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असताना देशातील ७५ ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यातील ७५ महत्वाच्या घटनांची आठवण केली जाणार आहे त्याच बरोबर विविध कार्यक्रम गोधेगावसह सर्वत्र साजरे केले जात आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मीठाचा सत्याग्रह हा निर्णायक क्षणा पैकी एक आहे.याला दांडी यात्रा म्हणून इतिहासात उल्लेख केला जातो.याच घटनेला ९१ वर्ष होत आहेत.याच वेळी देशाचा अमृत महोत्सवही साजरा केला जात आहे.स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असताना देशातील ७५ ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यातील ७५ महत्वाच्या घटनांची आठवण केली जाणार आहे.स्वातंत्र्य लढ्यातील अनेक महत्वाच्या घडामोडींचा देशाला विसर पडला आहे.याच घडामोडी या माध्यमातून आजच्या पिढी समोर ठेवल्या जाणार आहेत.त्या अंतर्गत देशात विविध कार्यक्रम साजरे केले जात असून कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील इंग्लिश स्कूल महाविद्यालयाच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली आहे.
सदर प्रसंगी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन घोषणा दिल्या फलक व बॅनर घेऊन संपूर्ण गावातील मुख्य रस्त्यावर बाबत प्रभातफेरी काढून नागरिकांना हर घर तिरंगा लावण्याचे आवाहन केले.सदर प्रसंगी शाळेतील प्राचार्य व सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.