कोपरगाव तालुका
माजी खा.काळे यांनी समाजसेवेचा यशस्वी वारसा चालवला-बाळकृष्ण महाराज
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव लोकसभा मतदार संघाचे माजी खा.शंकरराव काळे हे समाजसेवेचे चालते-बोलते उदाहरण होते.त्यांनी आपल्या कालखंडात समाजसेवेचा वारसा समर्थपणे चालवला असल्याचे प्रतिपादन कराड येथील प्रसिद्ध कीर्तनकार बाळकृष्ण वसंतगडकर महाराज यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
माजी खा. काळे यांनी सहकारात व शिक्षण व सामाजिक क्षेत्रात लक्षवेधी काम केले. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम करताना शेती सिंचनाच्या पाण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयापर्यंत लढा दिला.शेतकऱ्यांचे ब्लॉक रद्द होऊ शकतात याची पहिली जाणीव करून दिली.व त्यांच्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. त्यांचे शब्द भांडार पाहिल्यावर ते त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती असल्याचे नक्कीच जाणवत रहाते.
कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाण्याचे संस्थापक संचालक माजी खासदार स्व. कर्मवीर शंकरराव काळे यांच्या सातव्या पुण्यस्मरणा कारखाना कार्यस्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ह.भ.प.बाळकृष्ण वसंतगडकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.सदर प्रसंगी माजी आ.अशोक काळे, स्नेहलताई शिंदे, अनिल शिंदे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, डॉ. मेघना देशमुख, आ. आशुतोष काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे, कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, कारखान्याचे संचालक, कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील,कारभारी जाधव, लहानुभाऊ नागरे, संभाजी काळे, कर्मवीर शंकरराव काळे मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, उपाध्यक्ष नारायण मांजरे, अॅड. प्रमोद जगताप, पंचायत समितीच्या सभापतीअनुसयाती होन, उपसभापति अनिल कदम, पंचायत समितीचे सर्व सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, संलग्न संस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष संचालक, पदाधिकारी, कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. जे. जगताप, सचिव एस. एस. कोल्हे, कार्यालयीन अधीक्षक बी. बी. सय्यद, गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, शरद पवार पतसंस्थेचे अध्यक्ष राधु कोळपे, सतीश कृष्णानी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे,हिरामण गंगुले, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख,दत्तात्रय गवारे, संतोष चवंडके, दिनार कुदळे, नवाज कुरेशी, सलीम पठाण, बाळासाहेब रुईकर, आदी मान्यवरांसह कोपरगाव मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कि,माजी खा. काळे यांनी शिक्षण क्षेत्रात लक्षवेधी काम केले. पाण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. त्यांचे शब्द भांडार पाहिल्यावर ते त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती असल्याचे जाणवत राहते. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार त्यांच्या सभेत कोपरगाव येथे केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत आ. आशुतोष काळे केवळ कोपरगाव पुरतेच मर्यादित नेतृत्व राहणार नसून ते भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करतील असा आशावाद त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.कार्यक्रमाचे प्रास्तविक संचालक कारभारी आगवन यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत गोरक्षनाथ जामदार यांनी केले तर आभार नारायण मांजरे यांनी मानले आहे.