कोपरगाव तालुका
कोपरगावात लोकशाहीर साठे यांच्या पुतळ्याच्या कामास आला वेग-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी “चबुतरा” उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रेमींची एक सर्वसमावेशक देखभाल व पावित्र्य समिती स्थापन करुन आता या कामाला वेग आला असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
“लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी सदर समिती नंतर ही समितीची धर्मादाय आयुक्तांकडे नोंद करून घेतली.तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,बांधकाम अभियंता डिगम्बर वाघ यांच्या माध्यमातून पुर्णाकृती पुतळ्यासाठी लागणाऱ्या सर्व शासकिय मान्यता आणल्या.त्यानंतर चबूतऱ्याचे काम सुरू झाले.ते लवकर पूर्णत्वास जावे यासाठी कामाला वेग देण्याच्या सुचना दिल्या आहे”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”या पुतळ्यासाठी सदर समिती नंतर ही समितीची धर्मादाय आयुक्तांकडे नोंद करून घेतली.तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,बांधकाम अभियंता डिगम्बर वाघ यांच्या माध्यमातून पुर्णाकृती पुतळ्यासाठी लागणाऱ्या सर्व शासकिय मान्यता आणल्या.त्यानंतर चबूतऱ्याचे काम सुरू झाले.ते लवकर पूर्णत्वास जावे यासाठी कामाला वेग देण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे देखभाल व पावित्र्य समितीही कार्यरत आहे. लवकरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची उभारनी होऊन कोपरगाव शहराच्या वैभवात भर पडणार असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी दिली आहे.