जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव रेल्वे स्थानकात रिक्षा लावण्याच्या कारणावरून मारहाण,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव रेल्वे स्थानकावर रिक्षा लावण्याच्या कारणावरून आपल्याला शिंगणापूर दत्तनगर येथील आरोपी सचिन बबन लगड याने शिवीगाळ करून काठी व लाथाबुक्य्यांनी मारहाण केली असल्याची फिर्याद समतानगर कोपरगाव येथील रिक्षाचालक रवींद्र तुळशीराम पाटील (वय-40 ) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

आपली रिक्षा (क्रं.-एम.एच.17 ए. जी.9767 ) घेऊन कोपरगाव रेल्वे स्थानकावर रात्री सव्वादहा वाजता गेले होते. व तेथे ते आपली रिक्षा रस्त्याचा बाजूला उभी करून प्रवाशांची वाट पाहत असताना तेथे आरोपी सचिन लगड हा दारू पिऊन आला व मला म्हणाला कि,तू इथे तुझी रिक्षा लावायची,येथु तू तुझी रिक्षा काढून घे.त्यावेळी आपण त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करीत असताना त्याने आपल्याला शिवीगाळ व दमदाटी करून आपल्याला तोंडावर,व पाठीत लाथा बुक्यांनी मारहाण केली त्यामुळे आपल्याला गंभीर दुःखापत झाली असून पाठीच्या हाडाला तडा गेला आहे.

रिक्षाचालक रवींद्र पाटील यांचा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय आहे.ते 22 ऑक्टोबर रोजी आपली रिक्षा (क्रं.-एम.एच.17 ए. जी.9767 ) घेऊन कोपरगाव रेल्वे स्थानकावर रात्री सव्वादहा वाजता गेले होते. व तेथे ते आपली रिक्षा रस्त्याचा बाजूला उभी करून प्रवाशांची वाट पाहत असताना तेथे आरोपी सचिन लगड हा दारू पिऊन आला व मला म्हणाला कि,तू इथे तुझी रिक्षा लावायची,येथु तू तुझी रिक्षा काढून घे.त्यावेळी आपण त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करीत असताना त्याने आपल्याला शिवीगाळ व दमदाटी करून आपल्याला तोंडावर,व पाठीत लाथा बुक्यांनी मारहाण केली त्यामुळे आपल्याला गंभीर दुःखापत झाली असून पाठीच्या हाडाला तडा गेला आहे.आपल्या उपचारानंतर आपण हि तक्रार दाखल केल्याने तक्रार दाखल करण्यास उशीर झाला आहे.

या प्रकरणी आरोपी सचिन लगड याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.369/2019 भा.द.वि.कलम 325,427,323,504,506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. व्ही.गवसने हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close