जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

टाकळीत एक जणाने घेतला गळफास,परिसरात खळबळ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीत दत्तात्रय करू माळी(वय -35 ) यांनी आपल्या राहत्या घरी दारूच्या नशेत गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली असल्याची माहिती त्याच गावातील उत्तम बाबुराव मोरे या मजुराने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नोंदवल्याने टाकली परिसरात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्याच्या वायव्येस साधारण सात कि.मी. अंतरावर टाकळी हे गाव असून या ठिकाणी काही मजूर शेतमजूरीचे कामे करतात. मंगळवार दि.29 ऑक्टोबर रोजी भाऊबीजेच्याच दिवशी मयत दत्तात्रय माळी हे जास्त दारू पिले व त्यांनी स्वतःवरील नियंत्रण गमावले.व त्यातच त्यांनी सकाळी आठच्या सुमारास आपल्या घरात जाऊन छताला दोर बांधून गळफास घेतला. मात्र त्याचे कारण समजू शकले नाही.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव तालुक्याच्या वायव्येस साधारण सात कि.मी. अंतरावर टाकळी हे गाव असून या ठिकाणी काही मजूर शेतमजूरीचे कामे करतात. मंगळवार दि.29 ऑक्टोबर रोजी भाऊबीजेच्याच दिवशी मयत दत्तात्रय माळी हे जास्त दारू पिले व त्यांनी स्वतःवरील नियंत्रण गमावले.व त्यातच त्यांनी सकाळी आठच्या सुमारास आपल्या घरात जाऊन छताला दोर बांधून गळफास घेतला या नंतर हि बाब नजीकच्या नागरिकांच्या लक्षात आली त्यांनी त्यांना उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता त्यांनी प्राथमिक तपासणी नंतर त्याना मयत घोषित केले आहे.कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद दप्तरात नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.दरम्यान या घटनेने टाकळी परिसरात खळबळ उडाली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close