जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे बदलणार पक्ष ! तालुक्यात खळबळ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

गत अडीच वर्षांपूर्वी कोपरगाव नगरपरिषदेत अध्यक्ष पदावर निवडून येऊनही भाजपात उपेक्षेचे धनी झालेले कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे हे नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत कमी मते पडल्याने अधिक विषण्ण झाले असून त्यातच भाजपने आयारामांच्या सांगण्यावरून केलेली उपेक्षा त्यांच्या जिव्हारी लागली आहे.परिणामस्वरूप त्यांनी पक्ष सोडण्याचा विचार चालवला असून त्यांनी सत्ताधारी पक्षाचा मित्र पक्ष असलेल्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली असल्याचे विश्वसनिय वृत्त प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान या बाबत मात्र आमच्या प्रतिनिधीस वरिष्ठ पातळीवरून दुजोरा मात्र मिळालेला नाही.

2016 मध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळीही नुकत्याच पराभूत झालेल्या लोकप्रतिनिधिंच्या पक्षाचे काही वरिष्ठ नेते नादी लागून वहाडणे यांना डावलण्यात आले होते.म्हणून विजय वहाडणे नाईलाजाने अपक्ष म्हणून उभे राहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले.तरीही कुटील राजकारण करणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडून भाजपाच्या मंत्र्यांनी कोपरगाव नगरपरिषदेस निधी मिळण्यात सातत्याने अडथळेच आणले.शहरविकास वेगाने झाला तर विधानसभा निवडणुकीत आपण अडचणीत येवू अशा संकुचित विचारांमुळे 5 क्रमांकाचा साठवण तलाव,शहरातील रस्ते,भुयारी गटार योजना मार्गी लागू शकल्या नव्हत्या.परिणाम स्वरूप कोपरगाव शहरविकास साधण्यासाठी वेगळा राजकीय विचार करण्याच्या मनस्थितीत वहाडणे असल्याचे समजते.

This image has an empty alt attribute; its file name is 20190929_200755-1.jpg

कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक नोव्हेंबर 2016 मध्ये संपन्न झाली होती.या निवडणुकीत विजय वाहाडणे यांना येथिल मतदारांनी राज्यात सर्वाधिक मतांनी म्हणजे 18 हजार 500 मतांनी निवडून आले होते.मात्र 2014 च्या कोपरगाव विधानसभा निवडणुकीत आधीच आयाराम आलेले असल्याने व त्यांनी झारीतील शुक्राचार्यांची भूमिका वठविण्यास प्रारंभ केल्याने अडीच वर्षात कोपरगाव शहराच्या विकास कामांचे अनेक प्रस्ताव,मागण्या,निवेदने देऊनही त्याची कधीच गंभीरपणे दखल स्वतःच्या भाजपने घेतली नाही.त्यामुळे या पक्षाबद्दल त्यांचा अतिशय भ्रमनिरास झालेला आहे.अनेक पिढ्या संघ-जनसंघ-भाजपाचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वहाडणे यांना जाणीवपूर्वक डावलणारी टोळी पक्षात कार्यरत आहे.पक्षाने सांगितले म्हणून 2014 मध्ये विजय वहाडणे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला व पक्षादेशानुसार माघारही घेतली.तरीही 2016 मध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळीही नुकत्याच पराभूत झालेल्या लोकप्रतिनिधीच्या पक्षाचे काही वरिष्ठ नेते नादी लागून वहाडणे यांना डावलण्यात आले होते.म्हणून विजय वहाडणे नाईलाजाने अपक्ष म्हणून उभे राहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले.तरीही कुटील राजकारण करणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडून भाजपाच्या मंत्र्यांनी कोपरगाव नगरपरिषदेस निधी मिळण्यात सातत्याने अडथळेच आणले.

विजय वहाडणे यांनी आयाराम पक्षात घ्या पण त्यांना काही दिवस पक्षात काम करू द्या व त्या नंतरच उमेदवाऱ्या द्याव्या असे अनेकदा सांगितले होते. त्यांचे म्हणणे कुणीच विचारात न घेतल्याने आज जिल्ह्यात भाजपा शून्यावर आली आहे हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही.ज्या पक्षासाठी अनेकांनी आयुष्य वेचले त्या पक्षाची दुरवस्था गंभीर आहे.पक्षात चाललेली काही प्रवृत्तीची दादागिरी,दहशत मान्य नसतांना तेथे केवळ पक्षशिस्त म्हणून खाली मान घालून बसणे हा जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा विश्वासघातच समजला जात आहे.

शहरविकास वेगाने झाला तर विधानसभा निवडणुकीत आपण अडचणीत येवू अशा संकुचित विचारांमुळे 5 क्रमांकाचा साठवण तलाव,शहरातील रस्ते,भुयारी गटार योजना मार्गी लागू शकल्या नव्हत्या.परिणाम स्वरूप कोपरगाव शहरविकास साधण्यासाठी वेगळा राजकीय विचार करण्याच्या मनस्थितीत वहाडणे असल्याचे समजते.धनाढ्य आयारामांच्या दबावाखाली,पक्षशिस्तीच्या नावाखाली होणाऱ्या गलिच्छ राजकारणाला छेद देण्यासाठी पक्ष बदलाचा,व तशी पावले उचलण्याचा विचार होतो आहे.मागील महिन्यात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी मुंबई येथे प्रत्यक्ष जाऊन एका महत्वाच्या पक्ष प्रमुखाची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केल्याचे समजते.हे राजकिय पाऊल शहर विकासासाठी उचलून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा इरादा असल्याची माहिती आहे.अहमदनगर जिल्ह्यातील पक्ष संघटन खिळखिळे होऊ नये यासाठी विजय वहाडणे यांनी आयाराम पक्षात घ्या पण त्यांना काही दिवस पक्षात काम करू द्या व नंतरच उमेदवाऱ्या द्या असे अनेकदा निक्षून सांगितले होते. त्यांचे म्हणणे कुणीच विचारात न घेतल्याने आज जिल्ह्यात भाजपा शून्यावर आली आहे हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही.ज्या पक्षासाठी अनेकांनी आयुष्य वेचले त्या पक्षाची दुरवस्था गंभीर आहे.पक्षात चाललेली काही प्रवृत्तीची दादागिरी,दहशत मान्य नसतांना तेथे केवळ पक्षशिस्त म्हणून खाली मान घालून बसणे हा जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा विश्वासघातच समजला जात आहे.पक्षाला भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले सहकार सम्राट चालतात पण विजय वहाडणे मात्र नकोसे वाटतात यावरूनच भाजपाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे यावरही भाजप निष्ठावान अस्वस्थ असल्याची माहिती हाती आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close