गुन्हे विषयक
पावसाचे पाणी काढण्याच्या कारणावरून मारहाण,सहा जणांवर गुन्हा तर अन्य दोन गुन्हे दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मंजूर ग्रामपंचायत हद्दीतील नुकत्याच पडलेल्या पावसाचे पाणी काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास रस्त्यावरून काढून देत असताना त्याच गावातील आरोपी सदन पांडुरंग पायमोडे,संभा सदन पायमोडे,कुसुम सदन पायमोडे, वैशाली संभा पायमोडे,दिलीप पांडुरंग पायमोडे,दादा दिलीप पायमोडे यांनी आपल्याला शिवीगाळ दमदाटी करून लाथा बुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद शिवाजी भाऊसाहेब धोडमल (वय-५८) या जखमी झालेल्या फिर्यादीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.त्यामुळे मंजूर परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान दुसऱ्या आणखी एका घटनेत ब्राम्हणगाव येथील फिर्यादी प्रमोद राधाकृष्ण देशमुख (वय-५०) यांचा रविवार दि.२७ जून रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरासमोर बांधून ठेवलेले दोन वर्षाचे अंदाजे किंमत १४ हजार रुपये असलेल्या दोन काठेवाडी बकऱ्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्या आहेत.याबाबतही कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याचा तपास पो.हे.कॉ.ए.एम.आंधळे करीत आहेत.तर आणखी तीसऱ्या घटनेत एका अज्ञात चोरट्याने फिर्यादी गजेंद्र शरदचंद्र देशमुख रा.माहेगाव देशमुख यांच्या कुंभारी शिवारातून पोल्ट्रीची जाळी तोडून १५ हजार रुपये किमतीचा डोंगल,व ५०० रुपये किमतीचे कोंबड्यांचे अंडे असा १५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,रविवार दि.२७ जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्याच्या वायव्येस सुमारे पंचवीस की.मी.अंतरावर मंजूर ग्रामपंचायत असून या हद्दीत नुकताच मुसळधार पाऊस कोसळला आहे.या पावसाने शेतीच्या खोळंबलेल्या खरीप पेरण्यांना वेग येणार आहे.मात्र त्या पावसाने अवघ्या काही तपासात पाणीच पाणी चोहीकडे करून दिल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे.अशीच घटना फिर्यादी राहत असलेल्या मंजूर शिवारात घडली असून या ठिकाणी कोसळलेल्या पावसाचे पाणी शेतातून रस्त्याच्या पलीकडे काढून देत असताना फिर्यादिस त्याच गावातील आरोपी सदन पांडुरंग पायमोडे,संभा सदन पायमोडे,कुसुम सदन पायमोडे, वैशाली संभा पायमोडे,दिलीप पांडुरंग पायमोडे,दादा दिलीप पायमोडे यांनी,”पावसाचे पाणी रस्त्यावरून काढू नको” असे म्हणून आपल्याला शिवीगाळ दमदाटी करून लाथा बुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यातील आरोपी सदन पायमोडे याने फिर्यादीच्या डोक्यात काठीने मारून त्यास जखमी केले आहे. या प्रकरणी फिर्यादीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध फिर्यादी दाखल केली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी वरील सहा आरोपी विरुद्ध गु.र.क्रं.२४१/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३२३५०४,५०६,१४३,१४७,१४८१४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. व्ही.गवसने हे करित आहेत.