कोपरगाव तालुका
कोपरगाव विधानसभा निवडणुकीचे महाभारत,व आ.काळेंची वाटचाल कशी राहणार ?
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
जनतेला गृहीत धरणाऱ्यांना जनता घरी पाठवते आणि ती जागा विरोधी पक्षाकडे देते याचा प्रत्यय नुकताच राज्यात नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत आला आहे. त्याला नगर जिल्हा आणि कोपरगाव मतदारसंघही अपवाद नाहीत.या तिन्ही पातळ्यांवर जनतेला गृहीत धरून जो उन्माद चालला होता.तो अत्यंत निंदनीय होताच पण सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाराही होता.त्यामुळे जनतेने दिलेला कौल अनेक अर्थानी चांगुलपणा दर्शवणारा ठरला आहे.त्यामुळे “मी, “येणार,मी येणार” म्हणारांना आता स्वतःचे आसन वाचविण्याची भ्रांत पडली आहे.गत वेळी 122 जागा देणाऱ्या जनतेने 105 वर आणून ठेवले आहे.व सेनेची घसरगुंडी केली आहे.तर “नगर जिल्ह्यात बारा जागा निवडून आणतो” म्हणणाऱ्या विखेंना आता स्वतःचे मंत्रिपद वाचविणे अवघड बनले आहे.आता पडलेल्या उमेदवारांनी धावाबोल करून मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्याने आगामी काळात ऐन दिवाळीत शिमगा साजरा होण्याची चिन्हे आहेत.त्यामुळे जशी राज्याची समीकरणे झपाट्याने बदली तशीच नगरची व कोपरगाव तालुक्याची समीकरणेही बदलली आहे हे कोणाही चाणाक्ष माणसाच्या पटकन लक्षात येईल.कोपरगाव तालुका तसा स्थितीवादी म्हणून येथील मतदारांनी आपली सत्तर वर्षात ओळख करून ठेवलेली आहे.त्यामुळे काम करा नाही तर नका करू ! पण हे कधी स्थित्यंतर करण्याच्या भानगडीत फारसे पडत नाही.मात्र या वेळी कोपरगाव तालुक्याने आपली राजकीय कूस बदलली असे म्हणण्यास वाव आहे.
सत्ताधाऱ्यांचा उन्मत्तपणा एवढा वाढला होता कि,फक्त माणसांना पायाने ठोकरण्याने तेवढे बाकी राहिले होते.नको ते पन्नास वर्षाचे “मढे” उकरून त्यावरच जुगार लावून जनतेला बनविण्याचे प्रकार चालविल्याने याची वेगळी परिणीती होऊच शकत नव्हती.सत्ता विनयानेच शोभून दिसते “च” लावल्याने नव्हे! त्याची पुनरावृत्ती झाली कि जनता नेहमीच सत्तेचे विकेंद्रीकरण करते.याचा अनुभव पराभूत उमेदवार घेत असतील. सशक्त भासणारा प्रत्यक्षात अशक्तापेक्षा अंतिमतः निरुपयोगी ठरतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.येथे बंगारु लक्ष्मण यांचा वारसा चालविणाऱ्यांना जनतेने आस्मान दाखवले आहे.
सत्ताधाऱ्यांचा उन्मत्तपणा एवढा वाढला होता कि,फक्त माणसांना पायाने ठोकरण्याने तेवढे बाकी राहिले होते.नको ते पन्नास वर्षाचे “मढे” उकरून त्या आडून त्यावरच जुगार लावून जनतेला बनविण्याचे प्रकार चालविल्याने याची वेगळी परिणीती होऊच शकत नव्हती.सत्ता विनयानेच शोभून दिसते “च” लावल्याने नव्हे! त्याची पुनरावृत्ती झाली कि जनता नेहमीच सत्तेचे विकेंद्रीकरण करते.याचा अनुभव पराभूत उमेदवार घेत असतील. सशक्त भासणारा प्रत्यक्षात अशक्तापेक्षा अंतिमतः निरुपयोगी ठरतो असा जगाचा अनुभव ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रसिद्ध विचारवंत प्रा.ब्राऊन यांनी लिहून ठेवले आहे.याचा दाहक अनुभव वर्तमानात पराभूत उन्मादी नक्कीच घेत असतील.तसा तो यावा असे कोणाचेही मत असू नये.मात्र काही जण आपल्या अति आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःहून “मी” चे बळी ठरत असतात त्यात कोणाचाही दोष नसतो.या अतिआत्मविश्वासाने जसा मुख्यमंत्र्यांचा रथ जमिनीपासून वर दोन अंगुळे चालत होता त्या पेक्षा कोपरगावात तो दहा अंगुळे चालत होता.परिणाम समोर आहेच.सुरुवातीस त्याना सोपी वाटणारी निवडणूक हातातून वाळू निसटावी तशी निसटून गेली आहे व सत्ताधाऱ्यांना केवळ पाहत राहावे लागले.वास्तवात न येणारी स्वप्ने दाखवून तुम्ही आजपर्यंत जनतेला मूर्खात काढले तोच खेळ पुन्हा सुरु केला.उत्तर नगर जिल्ह्यातील 182 दुष्काळी गावांना आपल्या घरातील थोरल्या पातीनी जवळपास पन्नास वर्ष वेड्यात काढून अनेक निवडणुका जिंकल्या व त्याच निळवंड्याच्या शिळ्या कढीला उत आणून व पॅकिंग बदलून तेच उत्पादन शहरातील जनतेला खपविण्याचे षडयंत्र जनतेच्या पचनी पडले नाही.”हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे” अशा अर्थाची मराठीत एक म्हण आहे तीच बाब या प्रकरणाला लागू आहे.निळवंडेची जलवाहिनी व्यवहार्य नाही हे आपल्याच घरातील जेष्ठ नेत्याने सांगून त्याचा उपयोग झाला नाही.अभियंत्यांनी हि योजना व्यवहार्य नाही हे अनेक वेळा सांगूनही पालथ्या घड्यावर पाणी पडले.नांदूर-मधमेश्वर उंचावनी बंधाऱ्यातून बंदिस्त जलवाहिनीने व्यवहार्य व विद्युत बिलाशिवाय प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी मिळत असताना व तिचे पावणे सहा कोटी पाण्याची थकपट्टी असताना निळवंडेवरून जवळपास पावणे तीन कोटी विद्युत बिलाचे उचल पाणी कसे परवडणार ? याचा अखेरपर्यंत खुलासा सत्ताधाऱ्यांना करता आला नाही.
2011 साली कोपरगाव पालिकेत असलेल्या तत्कालीन असलेल्या सत्ताधाऱ्यानी नांदूर-मधमेश्वर येथून उद्भव असलेली 89 कोटींची योजना बनवून तिचे अंदाज पत्रक मंजूर करून ती अंतिम टप्य्यात आणून देखील सामाजिक संकेतस्थळावर मात्र निवडणुकीत थेट जनतेच्या डोळ्यात धूळ झोकण्याचा प्रयत्न केला.व सत्ताधाऱ्यांनी त्याना शब्दाने रोखले नाही.हि घटना सत्ताधाऱ्यांचा टोकाचा दांभिकपणा दाखवणारी होती.अशा फसव्या नेत्याना मतपेटीतून दिल्या जाणाऱ्या शिक्षेसारखी दुसरी शिक्षा लोकशाहीत दुसरी नाही.व जनतेने ती नेमक्या वेळी दिल्याने कोपरगावचे मतदार अभिनंदनास खास पात्र ठरतात.
तीच बाब रस्ते,बसस्थानक,त्यांचे थांबे,स्मशानभूमीशेड या बाबतही लागू होते.गोदवरीचे दिवसा ढवळ्या झालेले वस्रहरण तर पाहण्यापालिकडचे होते.असो हि यादी खूपच लांबु शकते.त्याची शिक्षा मतदारांनी योग्य वेळी दिली आहेच पण ज्या कोपरगावातील प्रभागात दोन माजी नगराध्यक्ष,विद्यमान उपनगराध्यक्ष, नगरसेवक,अन्य संघटनांचे जिल्हा पातळीवरील प्रमुख,माजी शहरप्रमुख असतानाही या प्रभागात आशुतोष काळे गटाचा एकही नगरसेवक नसताना तेथे काळेंना मताधिक्य मिळते हि बाब शहरातील चित्र स्पष्ट करण्यासाठी पुरसी बोलकी ठरावी.निवारा परिसरात 38 मतांचे मताधिक्य वगळता शहरातही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ( सत्ताधाऱ्यांचे मागचे 30 हजारांचे मताधिक्य पाहता ) किती मोठी लाट होती हे सांगण्यास पुरेशी ठरावी.शहरात गतवेळी सत्ताधाऱ्यांना मोठे मताधिक्य असताना या वेळी त्यांचा बनेलपणा मतदारांना मुळीच भावला नाही.कोल्हे गटाचा ज्या गावात बाजार समितीचे सभापती पद, व तालुकाध्यक्ष पद दिले आहे.त्या कोकमठाण येथे काळे गटाला 89 मतांचे मताधिक्य मिळावे हि बाब बरेच काही सुरळीत असल्याचे सांगत नाही.अंतर्गत हा गट किती पोखरला गेला आहे याचे हे निदर्शक आहे.
आ. आशुतोष काळे यांच्या समोर आता रस्ते,शहर पिण्याच्या पाण्याबरोबर,शेती सिंचनाचा प्रश्न “आ” वासून उभा आहे.रोजगार वाढविण्यासाठी औद्योगिक वसाहत निर्मितीसाठी समृद्धी महामार्गाची स्मार्ट सिटी तालुक्यात आणणे, त्याच सोबत गत पाच वर्षात अर्धवट असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था इमारतीस पूर्णत्वास नेणे, शहरात जमिनीखालून विद्युत वाहक तारांची योजना पूर्णत्वास नेणे. समन्यायी पाणी वाटपाचे गारुड दूर करून पश्चिमेचे पाणी पूर्वेस वळविणे, शेती आवर्तने वेळेत देऊन त्यांच्या बैठका तालुकास्तरावर घेणे,शहर झोपडपट्टी मुक्त करणे,गोदावरी प्रदूषण मुक्त करणे,आदी आव्हाने आहेत.
एकूण 269 मतदान केंद्रापैकी 150 मतदान केंद्रावर काळे गटाला मताधिक्य तर कोल्हे गटाला 109 केंद्रावर मताधिक्य दर्शवत आहे.तर आठ मतदान केंद्रावर परजणे गटास मताधिक्य दिसत असून हा गट अद्याप संवत्सर व कोकमठाणच्या बाहेर अद्याप पडलेला नाही असे म्हणायला जागा आहे.नाही म्हणायला पढेगाव,शिंगणापूर,गोधेगाव,तीळवणी,आपेगाव,कुंभारी,जेऊर कुंभारी,कान्हेगाव,तळेगाव मळे, डाऊच,सोनेवाडी,वाकडी,अंजनापूर आदी ठिकाणी परजणे गटाने कसेबसे तीनं अंकी मते मिळवली आहेत.त्यामुळे विखे गटाने भाजपाला दगा केला असा आरोप करण्यास सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांना जागा दिसत नाही.गत वेळी हीच मते काँग्रेसच्या माध्यमातून औताडे यांचेकडे वळली असल्याचे अनेकांना स्मरत असेल.तर कोपरगाव शहरातील एकही मतदान केंद्रावर परजणे गटास तीन अंकी मतदान मिळवता आलेले नाही.उलट या पूर्वी हि मते काळे गटाकडे वळत असल्याची आकडेवारी सांगते.त्यामुळे माजी आ. स्नेहलता कोल्हेंचा विखे विरोधातील दावा फुसका ठरतो.या शिवाय मतदान केंद्र क्रं.136 मध्ये तर दोन्ही प्रमुख उमेदवारांना समसमान 317 मते मिळाली.अशीच बाब राहाता तालुक्यातील जळगावातही दिसून आली आहे.तेथेही काळे-कोल्हे यांना समसमान 330 मते मिळाली आहे.पुणतांबा व वाकडी गटात एकूण 31 मतदान केंद्रापैकी 23 मतदान केंद्रावर कोल्हे पर्यायाने भाजपची मतांच्या बाबतीतीत मोठी आघाडी दिसून येत आहे तर काळे म्हणजेच राष्ट्रवादीस मात्र फक्त सात ठिकाणी आघाडी मिळाल्याचे दिसते.म्हणून मुख्यमंत्र्यांकडे कोल्हे गटाने केलेला दावा हा फसवा असल्याचे विखे सप्रमाण सिद्ध करून कोल्हेना तोंडघशी पाडू शकतात.याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. तात्पर्य या निवडणुकीत कोल्हे गटाला त्यांच्या लीला पाहून मतदारांनी सपशेल नाकारले हे सप्रमाण सिद्ध होत आहे.खरे तर सत्ता मानवजातीच्या उद्धारासाठी वापरणे आवश्यक असताना तिचा वापर स्वतःचा उद्धार करण्यासाठी केला हे आता या मतदारानी शिक्कामोर्तब केले आहे.आता यातून चूक समजून घेण्यातुन सुधारणेचा आरंभ होत असतो,या उलट चूक रेटून नेण्यातून त्याची पुनरावृत्ती होत असते.यातून ते कोणता बोध घेणार हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे.न घेतला तर मात्र सावरण्याचा कालखंड निघून जात असतो.यातून माजी.आ. कोल्हे या कोणती भूमिका घेतात हे लवकरच समजून येईल.या उलट आशुतोष काळे यांनी विजयासाठी काय केले असे कोणी विचारले तर त्याला उत्तर त्यांनी केवळ पक्ष बदलाचा केलेला प्रयत्न हे होय.या निवडणुकीत खरी लढाई हि माजी आ.स्नेहलता कोल्हे व कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्यातच होती.व ती कोपरगाव साठवण तलाव करण्यावरून रंगात आली होती.त्यांनी निळवंडेच्या जलवाहिणीस विरोध केल्याचे कुठेही सत्ताधारी पक्षाला निवडणुकी आधी सप्रमाण सिद्ध करता आलेले नाही.साप-साप म्हणून त्यांनी वहाडणे यांच्या नावाने केवळ भुई बडवली.या उलट माजी आ. कोल्हे यांनी पाणी आणल्यास आपण त्याचे सर्वात प्रथम स्वागत करू असे अनेक वेळा त्यांनी बजावूनही त्याना सत्ताधारी भाजपकडून लक्ष करण्यात आले होते.कारण कोपरगाव नगरपरिषदेत नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी साडे अठरा हजार मतांचे मिळवलेले मताधिक्य हीच बाब सत्ताधारी गटाला एखाद्या इंगळी सारखी झोंबत होती.व त्यामुळे आगामी काळात तेच आपले विरोधक आहेत.अशी समजूत होऊन त्यांना प्रत्येक ठिकाणी अडविण्याची शपथच कोल्हे यांनी घेतल्याने हा अकाली शिमगा विधानसभा होईपर्यंत थांबणार नाही हि बाब सुर्यप्रकाशाइतकी स्वच्छ होती आणि ते खरेही निघाले.मात्र वहाडणे यांना हटविण्याच्या नादात सत्ताधारांना मात्र जनतेने आता आपला प्रपंच करण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे.
नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना मते कमी का मिळाली ?
आता राहाता राहिला विजय वहाडणे यांचा प्रश्न वहाडणे यांना या निवडणुकीत एवढी कमी मते का मिळाली ? प्रत्येकास या प्रश्नाने घेरले आहे.यात अवघड असे काही नाही ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले हे कोल्हे यांचे कट्टर विरोधक म्हणून मात्र त्यांनी या बाबत गत तीन वर्षात शहरातील जनतेचा भ्रमनिरास केला.जशास तसे भूमिका न घेण्याने शहरातील मतदार त्यांच्यावर नाराज होते.या खेरीज आम्ही जनशक्ती न्यूजच्या 23 ऑक्टोबरच्या अंकात मतविभागणीचा फायदा सत्ताधाऱ्यांना होण्याची शक्यता कमी असल्याचे बजावले होते व आशुतोष काळे हेच सत्तेचे प्रबळ दावेदार असल्याचा अंदाज वर्तवला होता तो तंतोतंत खरा ठरला आहे.तसेच या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी लढवणारे उमेदवार राजेश परजणे हे वहाडणेंचा विजयरथ रोखण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे बजावले होते.त्याचा प्रत्यय आला आहेच.कारण कोपरगाव विधानसभा मतदारसंघात दोनास एक अशी लढत झाली तरच मतदार आपली जागा सोडण्यास धजवतात अन्यथा ते आहे त्या जागी राहून ज्याचा घोडा शेमी गोंडयासाठी पुढे जाण्याची शक्यता अधिक त्यासच आपली रसद पुरवुन प्रस्थापितांना धडा शिकवतात.व मतविभागणी टाळण्याचा प्रयत्न करतात याचीच पुनरावृत्ती कोपरगाव मतदारसंघात झाली असल्याने वहाडणे यांचा “विजय”रथ रोखला गेला आहे.त्यातच मतदारांवर गत पाच वर्षात भाजप सत्ताधाऱ्यांच्या वागणुकीने , “भीक नको पण कुत्रे आवर” म्हणण्याचा अनास्था प्रसंग गुदरला होता.असे असले तरी आता कोपरगाव नगरपरिषदेत विजय वहाडणे यांना आता काम करण्यास मोकळा श्वास घेता येणार आहे.
या निवडणुकीत आता एक गोम पुन्हा पैदा झाली असून माजी आ. अशोक काळे हे दहा वर्ष सेनेकडून निवडून आले त्यावेळी दहाही वर्ष त्यांनी “आम्ही सरकारात नाही” हे तुणतुणे वाजवले होते.व तत्कालीन विरोधकांनी सत्ताधारी पक्षाच्या आडोशाने प्रत्येक कामात स्रेयवाद आडवा घालून त्यांना आडवी टांग घातल्याची घटना फार जुनी नाही.परिणामस्वरूप मतदारांची घोर निराशा झाली होती त्याची पुनरावृत्ती नवोदित आ.आशुतोष काळे यांना करता येणार नाही.विरोधी पक्षात राहूनही चारित्र्य आणि विश्वासार्हता या गुणांवर विधिमंडळातील अस्रे वापरून जनशक्तीच्या बळावर जनतेची कामे करता येतात हे त्यांच्याच पक्षाच्या स्व.आर.आर.पाटील,जयंत पाटील,दिलीप वळसे पाटील या नेत्यांनी युती शासनाच्या काळात सप्रमाण दाखवून दिले आहे.विरोध हा तथ्य आणि सत्य यांच्या जोरावर अपेक्षित असतो.त्या आघाडीवर आता त्यांना “विरोधी आमदार” या बिरुदाच्या आड लपता येणार नाही.
या निवडणुकीत आता एक गोम पुन्हा पैदा झाली असून माजी आ. अशोक काळे हे दहा वर्ष सेनेकडून निवडून आले त्यावेळी दहाही वर्ष त्यांनी,”आम्ही सरकारात नाही” हे तुणतुणे वाजवले होते.व मतदारांची घोर निराशा केली होती त्याची पुनरावृत्ती नवोदित आ.आशुतोष काळे यांना करता येणार नाही.विरोधी पक्षात राहूनही चारित्र्य आणि विश्वासार्हता या गुणांवर विधिमंडळातील अस्रे वापरून जनशक्तीच्या बळावर जनतेची कामे करता येतात हे स्व.आर.आर.पाटील,जयंत पाटील,दिलीप वळसे पाटील यांनी युती शासनाच्या काळात दाखवून दिले आहे.व हिच अस्रे वापरून भाजप-सेनेच्या आमदारांनी आपला सत्ताधाऱ्यांवर वचक स्थापित केल्याची अनेक उदाहरणे देता येतील.विरोध हा तथ्य आणि सत्य यांच्या जोरावर अपेक्षित असतो.त्या आघाडीवर आता त्याना “विरोधी आमदार” या बिरुदाच्या आड लपता येणार नाही.
आ. काळे यांनी आता तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्वरित बैठक घेऊन साठवण तलाव क्रं. पाचचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा लागेल.भलेही भाजपचे निष्ठावान म्हणून पालिकेचे अध्यक्ष वहाडणे यांच्या प्रतिमेचा वापर करून भाजप सरकारकडून कामे करून घेण्या कामी येतील.त्यांनी संकोच धरता कामा नये. व वहाडणे यांनीही शहराच्या भल्यासाठी आता राहिलेल्या दोन वर्षात अधिक आक्रमक राजनीतीचा अंगीकार करुन विरोधी पक्ष नेत्याचा अवकाश व्याप्त करावा लागेल तरच त्यांनाही उज्वल भवितव्य आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्वरित बैठक घेऊन साठवण तलाव क्रं. पाचचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा लागेल.भलेही भाजपचे निष्ठावान म्हणून पालिकेचे अध्यक्ष वहाडणे यांच्या प्रतिमेचा वापर करून भाजप सरकारकडून कामे करून घेता येतील.त्यात संकोच करता कामा नये. व वहाडणे यांनीही शहराच्या भल्यासाठी आता राहिलेल्या दोन वर्षात अधिक आक्रमक राजनीतीचा अंगीकार केला तरच त्यांनाही उज्वल भविष्य आहे.नवोदित आ. काळे व वहाडणे यांनी शहर विकासाठी अघोषित युती केली तर बरीच प्रलंबित कामे मार्गी लावता येतील.मात्र आ. काळे यांनी सहकारी कारखानदारीतील (वार्षिक सभा एकाच दिवशी व वेळी ) घेण्याची अघोषित युती माजी मंत्री कोल्हेंशी ठेवली तर तालुक्याने सत्ता बदल करूनही जनतेच्या हाती काहीच येणार नाही.आता तालुक्याला प्रगती पथावर न्यायचे कि अधोगतीला हि बाब नवोदित आ. आशुतोष काळेंवर सर्वस्वी अवलंबून आहे.मतदारांचे काम आता पाच वर्ष संपले आहे.