जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात उद्या भाजपचे काय होणार! तालुक्याच्या निकालाकडे मतदारांचे बारीक लक्ष

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव विधानसभा निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.या निवडणुकीत पावसाने उत्साहवर्धक साथ दिल्याने शेतकऱ्यांत मोठा उत्साह आहे.या निवडणुकीत एकूण 2 लाख 64 हजार 832 मतदारांपैकी 2 लाख 01 हजार 874 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून हि टक्केवारी 76.23 इतकी आली असून विधानसभा निवडणुकीत हा विक्रम मानला जात आहे.त्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या कमळाबाईंची (कमळ चिन्ह असल्याने ) आमदारकी जाणार कि राहणार याकडे राजकीय निरीक्षकांचे सर्वाधिक लक्ष लागून आहे.

गत निवडणुकांचा अनुभव पाहता सत्ताधाऱ्यांच्या थोरल्या पातींच्या काळात काळे- कोल्हे यांच्यात दुरंगी झाली तरच नैऋत्य गडाला धोका होत होता.तिरंगी किंवा बहुरंगी लढतीत त्यांची सरशी होत असे.मात्र उत्तोरोत्तर या सिद्धांतात उतार येत गेला आहे.व आता तिरंगी लढत झाली तरी दोन्ही सत्तांना हादरे देण्याची क्षमता मतदारांनी मिळवली आहे.त्यामुळे या वेळी मतविभागणी फळाला येईल हि शक्यता फार कमी वाटत आहे.जो कोणी निवडून येईल तो फार कमी मतांनी येण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीत सर्वाधिक मतदान घोयगाव ग्रामपंचायत हद्दीत झाले असून ते 90.96 टक्के आहे.तर त्या खालोखाल मोर्विस गावात 90.27 तर त्या खालोखाल हंडेवाडी ग्रामपंचायत हद्दीत 89.51 टक्के उत्साहवर्धक मतदान संपन्न झाले असले तरी सर्वाधिक कमी मतदान हे कोपरगाव शहरातील मतदान केंद्र क्रमांक 100 वर नोंदवले गेले असून ते केवळ 54.44 टक्के इतके कमी असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.आता जास्तीचे मतदान कोणाला भोवणार व कोणाला पावणार याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. हि मतमोजणी 14 टेबलद्वारे संपन्न होत असून संपूर्ण निकाल येण्यासाठी दुपारी बारा वाजे पर्यंत वाट पहावी लागणार आहे.तरीही या निकालाकडे राजकीय निरीक्षक विविध दृष्टिकोनातून पाहत असून जनतेत विविध तर्क-कुतर्कानां उधाण आले आहे.

सर्वाधिक आधी प्रचाराला भाजपचे निष्ठावान सैनिक म्हणून विजय वहाडणे यांनीं सुरुवात केली होती व तो त्यांचा नैतिक अधिकार होता.मात्र पक्षाने त्यांना अखेरच्या क्षणी अंगठा दाखवला व पक्ष व त्यांचे नेते एक बी.एम.डब्ल्यू.(खूप मोठ्या किमतीची कार )व पंधरा खोक्यांसामोर झुकल्याचे बोलले जात आहे.निष्ठा व चारित्र्य या गोष्टीबाबत भाजपने आता आपले ओवळे-सोहळे कधीच सोडून ठेवले आहे.वर्तमानात अब्रू गुणांवर नाही तर द्रव्यावर मोजली जाते हा भाजपचा नवा नियम वहाडणे याना पचण्यास जरा जडच जाणार आहे तरी मात्र हे वास्तव स्विकारणे त्यांना अवघड असले तरी त्याना पचवून घ्यावे लागणार आहे.

सर्वाधिक आधी प्रचाराला भाजपचे निष्ठावान सैनिक म्हणून विजय वहाडणे यांनी सुरुवात केली होती व तो त्यांचा अधिकार होता.मात्र पक्षाने त्यांना अखेरच्या क्षणी अंगठा दाखवला व पक्ष आणि त्यांचे वरिष्ठ नेते एक बी.एम.डब्ल्यू.कार व पंधरा खोक्यांसामोर झुकल्याचे बोलले जात आहे.निष्ठा व चारित्र्य या गोष्टीबाबत भाजपने आता आपले ओवळे-सोहळे कधीच सोडून ठेवले आहे.वर्तमानात अब्रू गुणांवर नाही तर द्रव्यावर मोजली जाते हा भाजपचा नवा नियम वहाडणे याना पचण्यास जरा जडच जाणार आहे तरी मात्र हे वास्तव पचविणे अवघड असले तरी त्याना पचवून घ्यावे लागणार आहे.काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात व भाजपमध्ये आता काहीही फरक उरलेला नाही.त्यामुळे सर्वाधिक मेहनत करूनही वहाडणे यांच्या मतदारांची विभागणी करण्यासाठी सहकारातील धुरिणांनी राजेश परजणे यांची अपक्ष उमेदवारी देऊन सोयीस्कर चाल खेळल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान सत्ताधाऱ्यांना आपल्या काही मोहऱ्यांना त्यांच्या पराक्रमामुळे (?) मतदारांपासून दूर ठेवावे लागले हा त्यांचा नैतिक पराभव दिसत आहे.तर कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छीन्द्र टेके, त्र्यंबक सरोदे यांच्या सारखे कार्यकर्ते वैचारिक बैठक असतानाही त्याना जाणीवपूर्वक बाजूला ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.त्याचा फटका त्याना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

त्यामुळे मतदारांनी आपली मते विभागणी होणार नाही याची दक्षता घेतलेली दिसून येत आहे.त्यामुळे वहाडणे याना मते चांगली मिळालेली दिसून आली तरी ती विजयात रूपांतरित होण्याची शक्यता फार कमी दिसून येत आहे.यात एक तर लोणीकरांनी वहाडणे यांचे टोकदार नेतृत्व आपल्याला डोईजड ठरेल याची साधार भीती वाटत असल्याने त्यांनी उद्या उमेदवारी मागण्यासाठी वहाडणेंकडे जाण्याचा अनास्था प्रसंग टाळण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून येत असून भाजप कडून आ. स्नेहलता कोल्हे या निवडून आल्या तर मंत्रिपदाच्या वाटेकरी नको म्हणून सोयीस्कर रित्या परजणे गटाची मते परस्पर वळती केली असून ती जाणीवपूर्वक रोखली म्हणण्यास जागा आहे.दुपारच्या सत्रात लोणीकर थेट मतदान केंद्रावरूनच गायब होण्याची व ती मते कोपरगावच्या पश्चिमगडावर वळती केल्याच्या बातम्या पुणतांबा व वाकडी गटात उगीच पसरल्या नाही.शहरातील व्यापारी व त्यांचे हितचिंतक हे वहाडणे यांचे कडे वळणारी मते होती मात्र हि मते परजणेंकडे वळविण्यात आल्याने आ. कोल्हेच्या अडचणीत भर पडलेली आहे.पुणतांब्यातील कृषी कन्यांचे आंदोलन रात्री अडीच वाजता मोडल्याचे पडसाद या परिसरात बऱ्यापैकी उमटलेले दिसले आहेत.या खेरीज निळवंडेच्या लाभक्षेत्रातील गावे हि आ. कोल्हेच्या उपद्रवामुळे कधीच त्यांच्या हातातून निघून गेली होती.शहरातील झोपडपट्टी भाग हा कितीही पैसे सत्ताधारी वर्गाने उधळले तरी सत्ताधाऱ्यांना होणे दुर्मिळ बनले होते.त्यात सत्ताधारी गटाचे उपद्रव मूल्य पराकोटीचे जास्त असल्याने जनतेत पाच वर्षात तो उत्तोरोउत्तर वाढत गेल्याने व मतदारसंघात काम काहीच न दिसल्याने जनतेत नाराजी होती.त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या कार्यकर्त्याना सत्ताधारी वर्गाला समाधानी करता आलेले नाही.मागावून तर या नगरसेवक व नगरसेविका याना हाकलण्याच्या प्रकारात नातसुनांना फक्त हातात आसूड द्यायचा बाकी होता.तुलनेत आशुतोष काळे यांनी शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी व्यावहारिक रित्या सोडविण्यावर भर दिला तो व त्यांचा मितभाषी स्वभाव मतदारांना जास्त भावलेला दिसून आला असे वाटते.

गत वेळी सर्वच पक्ष विरूद्ध असतानाही आशुतोष काळेंनी एकट्याच्या बळावर 80 हजार मतांचा पल्ला गाठला होता.या वेळी शहरातील नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,माजी गटनेते डॉ.अजय गर्जे आदींनी त्यांची बेरीज नक्कीच वाढणार आहे.तुलनेने सत्ताधारी गटाकडे फक्त मिस्कॉलच जास्त आल्याचे दिसत आहे.त्यामागे जे मतदार रुपी बळ आवश्यक आहे ते आढळून आले नाही.शिवसेनेने आपली नेत्यांच्या आदेशाप्रमाणे भाजपाची साथसंगत केल्याचे नाटक चांगले वठवले आहे.त्याला दाद द्यावी लागणार आहे.त्याला एका नगरपरिषदेच्या माजी प्रमुख पदाधिकाऱ्याने दादांना बस स्थानकासमोरील सहकारी संस्थेत अर्धा-एक तास ताटकळत ठेवले त्याचा आहे.सुरुवातीपासूनच सत्ताधारी गटाला प्रचार फेऱ्या आणि सभांसाठी नजीकच्या तालुक्यातून पेड मजूर आणून आपली…झाकून न्यावी लागली हि बाबच त्यांना सत्तेपासून लोकांनी त्याना रोखल्याचे म्हणण्यास पुरेशी आहे.

गत वेळी तहसीलच्या मैदानावर तत्कालीन केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात सत्ता दिली तर आपण आगामी पाच वर्षात पश्चिम घाटमाथ्यावरील समुद्राला जाणारे पाणी पूर्वेकडे वळवून गोदावरी हे तुटीचे खोरे आहे ते अधिकचे (सरप्लस) करू असे जगजाहीर आश्वासन दिले होते.ते पाच वर्षात केवळ हवेचे बुडबुडे ठरले आहे.अर्थात त्यांचे बोलविले धनी हे स्थानिक साखर व मद्य संस्थानिकच होते हे जगजाहीर आहे.या वेळी हि निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे मुख्यमंत्री,अर्थमंत्री यांना आणून त्यांच्या कानाला चिमटा घेऊन त्यांच्या कडून अशक्य ते वदवून घेवून गत वेळचाच खेळ या वेळीही खेळला गेला.नोव्हेंबर 2016 नगरपरिषद निवडणुकीत निळवंडेची पिपाणी स्थानिक सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडून वाजवून घेतली होती ती व्यावहारिक नसताना त्यात आपली हवा भरून या मंत्र्यांना द्राविडी प्राणायाम करण्यास भाग पाडून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्याचे काम सत्ताधाऱ्यानी या वेळीही इमाने इतबारे केले.नंतर तर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या माहिती अधिकारात मुख्यमंत्री डॉ.आंबेडकर मैदानावर असे बोललेच नव्हते हे माहिती अधिकारात सिद्ध झाल्याने हि मंडळी नेमके काय साध्य करतात हे समजण्यास मार्ग नाही.तालुक्यात एकही रस्ता धड नसताना साडे तीनशे कोटींची थाप जनतेला निळवंडे सारखीच आवडलेली दिसून आलेली नाही.नागपूर मुंबई रस्ता तर “मौत का कुंवा” ठरला आहे.त्यावर एकाही राजकीय पक्षनेत्याने चकार शब्द काढू नये याला काय म्हणावे ? यातून या मंडळींनी पाच वर्षात दुसऱ्याच्या घरावर टेम्भें फेकण्याचे अनिष्ट काम केले तरी जनतेने आपल्याला मते द्यावी व त्यांची अपेक्षा करावी हे जरा आक्रीतच मानावे लागेल.

राजकारण हि शक्यतांची कला मानली जाते त्यामुळे खरी करामत मतपेटीतूनच उघड होणार आहे.त्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी आहे.सामान्य माणसांच्या मतांचा आदर करण्याची निवडणूक हि महत्वाचे साधन आहे.त्यांच्या मतांचा आदरही केला पाहिजे.मात्र तालुक्याच्या मतदारांनी राजकारण अजाणांच्या हाती जाणार नाही इतपत शहाणपण दाखवले तरी या निवडणुकीत खूप मिळवली.

गत निवडणुकांचा अनुभव पाहता सत्ताधाऱ्यांच्या थोरल्या पातींच्या काळात काळे- कोल्हे यांच्यात दुरंगी लढत झाली तरच नैऋत्य गडाला धोका होत होता.तिरंगी किंवा बहुरंगी लढतीत त्यांची सरशी होत असे.मात्र उत्तोरोत्तर या सिद्धांतात उतार येत गेला.व आता तिरंगी लढत झाली तरी दोन्ही सत्तांना हादरे देण्याची क्षमता मतदारांनी अनुभवपरत्वे मिळवली आहे.त्यामुळे यावेळी मतविभागणी फळाला येईल हि सत्ताधारी नेत्यांची अपेक्षा फार धूसर वाटत आहे.जो कोणी निवडून येईल तो फार कमी मतांनी येण्याची शक्यता आहे.हेच या विधानसभा निवडणुकीतून दिसून येणार आहे.त्यामुळे बहुरंगी लढतीत त्यांच्या गळाला फार काही लागण्याची शक्यता कमीच दिसत आहे.तरीही राजकारण हि शक्यतांची कला मानली जाते त्यामुळे खरी करामत मतपेटीतूनच उघड होणार आहे.त्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी आहे.सामान्य माणसांच्या मतांचा आदर करण्याची निवडणूक हि महत्वाचे साधन आहे.त्यांच्या मतांचा आदरही केला पाहिजे.मात्र तालुक्याच्या मतदारांनी राजकारण अजाणांच्या हाती जाणार नाही इतपत शहाणपण दाखवले तरी या निवडणुकीत खूप मिळवली.कारण झाले हे खूप झाले आहे.त्यांची पुनरावृत्ती नको इतकेच या निमित्ताने.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close