जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगांव विधानसभा मतदार संघाची उद्या मतमोजणी,अकरा वाजेपर्यंत होणार चित्र स्पष्ट !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगांव विधानसभा मतदार संघाची मत मोजणी उद्या सकाळी गुरुवार दि.२४ आँक्टोबर रोजी सकाळी ०८ वाजेपासुन सेवानिकेतन काँन्व्हेंट स्कूल,पुर्वेकडील तळमजला हाँल,कोपरगांव येथे संपन्न होणार आहे. मतमोजणी केंद्रावर १४ टेबल लावले असून मतमोजणीच्या २० फेऱ्या संपन्न होण्यासाठी। व्यवस्था करण्यात आली आहे.सकाळी- ८ वाजता टपाली मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी राहुल मुंडके यांनी जनशक्ती न्यूजला दिली आहे.

कोपरगांव विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आ.स्नेहलता कोल्हे,राष्ट्रवादीचे उमेदवार कर्मवीर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे ,वंचित आघाडीचे अशोक गायकवाड आदीं प्रमुख उमेद्वारांसह एकुण १४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते.त्यांचे भविष्य 21 ऑक्टोबर रोजी मतपेटीत बंद झाले असून उद्या ते खुले होणार आहे या कडे मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.

राज्याच्या विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणूक सोमवार दि.२१ आँक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघात झालेल्या मतदानात २०१८७४ (७६.२४%) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. कोपरगांव विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आ.स्नेहलता कोल्हे,राष्ट्रवादीचे उमेदवार कर्मवीर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे ,वंचित आघाडीचे अशोक गायकवाड आदीं प्रमुख उमेद्वारांसह एकुण १४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते.त्यांचे भविष्य 21 ऑक्टोबर रोजी मतपेटीत बंद झाले आहे.त्यांची मतमोजणी निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे उद्या मतमोजणी केंद्रावर १४ टेबल लावले असून मतमोजणीच्या २० फेऱ्या संपन्न होणार आहे.त्या दृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान काही सहकारी नेत्यांनी आपली कारखांनदारीची यंत्रणा (कर्मचारी ) आकडे जमा करण्यासाठी सर्वच टेबल जवळ रहावी यासाठी सर्वच पास या यंत्रणेला दिल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना या मतमोजणीस पास मिळवण्यासाठी अन्य उमेदवारांकडे धावा करावा लागला परिणामस्वरूप त्यांचा भाव वधारला असून त्यांनी आपले पास या कार्यकर्त्यांना काही हजार रुपयात विकले असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

सकाळी ८ :०० टपाली मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल आणि सोबतच ईलेक्ट्राँनिक मतमोजणी यंत्रासोबत सुरु राहील. मतमोजणी केंद्रावर निवडणूक शाखेमार्फत ओळखपत्र व्यक्ती देण्यात आलेल्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश असणार नाही.त्याच बरोबर मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल आणता येणार नाही.तसेच मतमोजणी केंद्राजवळ प्रिंट आणि ईलेक्ट्राँनिक मिडिया चे कामकाज पहाणारे अधिकृत ओळखपत्र असणारे प्रतिनिधी यांची स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. नागरिकांना मतमोजणी केंद्राच्या शंभर मिटरच्या बाहेर प्रत्येक फेरीचा निकाल लाऊडस्पीकर द्वारे कळविण्यात येईल.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे निवडणूक शाखा कोपरगांव यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close