जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात देशमुख महाराजांचा प्रवचन कार्यक्रम

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नामदेवराव परजणे आण्णा यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त इंदरीकरांचे प्रवचन गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक व दूध उत्पादकांचे नेते कै.नामदेवराव परजणे यांच्या १७ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त रविवार दि.२० जून रोजी प्रसिध्द कीर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) यांचा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दिली आहे.

“स्व.नामदेवराव परजणे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त रविवारी सकाळी १० वाजता संवत्सर येथील महानुभाव आश्रमासमोरील परिसरात वृक्षारोपन,तर सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील डिजिटल सॉफ्टवेअर सिस्टीमचा तसेच नवीन शाळा खोल्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे”-राजेश परजणे,अध्यक्ष,गोदावरी-परजणे दूध संघ.

पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त रविवारी सकाळी १० वाजता संवत्सर येथील महानुभाव आश्रमासमोरील परिसरात वृक्षारोपन,तर सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील डिजिटल सॉफ्टवेअर सिस्टीमचा तसेच नवीन शाळा खोल्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.त्यानंतर दुपारी २ ते ४ या वेळेत कीर्तनकार व प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) यांचा प्रवचनाचा कार्यक्रम नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा पुण्यस्मरण सोहळा मर्यादित स्वरूपात आणि शासनाने

घालवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन पार पाडण्यात येणार आहेत. उपरोक्त कार्यक्रम युट्यूब,फेसबुक तसेच गुगल मीटद्वारे ऑनलाईन प्रसारीत केले जाणार असल्याची माहितीही संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी शेवटी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close