कोपरगाव तालुका
दहिगाव बोलका येथे पर्यावरण सप्ताह साजरा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे मानव संरक्षण समितीच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुराडे यांचे संकल्पनेतून पर्यावरण सप्ताह निमित्ताने मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले आहे.
आपली पृथ्वी आणि पर्यावरण सुरक्षित आणि सुदृढ राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्याबाबतची जनजागृती आणि त्यासाठी आवश्यक कृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघामार्फत दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.दरवर्षी संयुक्त राष्ट्र संघामार्फत पर्यावरण रक्षणासंदर्भातील एक विषय जाहीर केला जातो आणि त्या विषयावर जगभरात विविध उपक्रम राबविले जातात.दहिगाव बोलका येथे हा उपक्रम भाऊसाहेब शिंदे यांनी साजरा करण्यात आला होता.
आपली पृथ्वी आणि पर्यावरण सुरक्षित आणि सुदृढ राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्याबाबतची जनजागृती आणि त्यासाठी आवश्यक कृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघामार्फत दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.दरवर्षी संयुक्त राष्ट्र संघामार्फत पर्यावरण रक्षणासंदर्भातील एक विषय जाहीर केला जातो आणि त्या विषयावर जगभरात विविध उपक्रम राबविले जातात.यंदा`प्लॅस्टिक प्रदूषण नियंत्रण’ हा विषय देण्यात आला होता.या निमित्ताने मानव संरक्षण समितीचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यासाठी मानव संरक्षण समितीचे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते.
महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात समितीने वृक्षारोपण करुन ठाणे मुंब्रा येथे पर्यावरण सप्ताहाची सांगता केली आहे. कोपरगाव तालुक्यात वृक्षारोपण करण्यासाठी पोलीस मित्र मंडळ दहेगाव बोलका यांचे सहकार्य व योगदान लाभले आहे.या अभियानातून मानव संरक्षण समितीने,”झाडे लावा, झाडे वाचवा आणि वृक्षतोड थांबवा”असा संदेश दिला आहे.