जाहिरात-9423439946
खगोल शास्त्र

कोपरगाव तालुक्यात पडली उल्का,ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात आज सकाळी सात वाजेच्या सुमारास भोजडे ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या किरण बबन ठाकरे यांच्या घराच्या छतावर आज उल्कासदृश वस्तू पडली असून ती आकाशातून चमकत घराचे छत फोडून आत आली व आलेल्या जागी मोठा खड्डा पडला असल्याची माहिती हाती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घरात आवाज व लकाकत पडलेली संशयास्पद उल्का छायाचित्रात दिसत आहे.

उल्का अवकाशात फिरणाऱ्या छोट्या छोट्या खगोलीय वस्तू जेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येतात आणि जळून जातात तेव्हा त्यांना उल्का किंवा अशनी या नावांनी ओळखले जाते.कोसळल्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्याआधीच त्यांचे एकसंध घनअस्तित्व संपुष्टात येते.उल्कांपैकी फारच थोड्यांचे पाषाण पृथ्वीतलावर आदळतात.अशीच घटना आज सकाळी कोपरगाव तालुक्यात घडली आहे.त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यास कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दुजोरा दिला आहे.

घराला पडलेले छिद्रे छायाचित्रात दिसत आहे.

उल्का अवकाशात फिरणाऱ्या छोट्या छोट्या खगोलीय वस्तू जेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येतात आणि जळून जातात तेव्हा त्यांना उल्का किंवा अशनी या नावांनी ओळखले जाते.कोसळल्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्याआधीच त्यांचे एकसंध घनअस्तित्व संपुष्टात येते.उल्कांपैकी फारच थोड्यांचे पाषाण पृथ्वीतलावर आदळतात.अशीच घटना आज सकाळी नगर जिल्ह्याच्या उत्तरेस असलेल्या कोपरगाव तालुक्यात भोजडे ग्रामपंचायत हद्दीत भोजडे चौकी येथील रहिवासी किरण बबन ठाकरे यांच्या घरावर पडली आहे.त्यामुळे भोजडे आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.आज सकाळी ६.५० वाजेच्या सुमारास किरण ठाकरे हे आपले नियत कर्म करत असताना त्यांच्या घरावर साधारण एक तीन कि.ग्रॅम वजनाची उल्का सदृश असलेली वस्तू चमकत व जोराचा आवाज करत कोसळली आहे.त्यामुळे त्यांच्या घराचा एक कोपऱ्यात असलेले घराचे पत्र्याचे छत सदर उल्काच्या जागी सच्छिद्र झाले आहे.सुदैव केवळ त्यावेळी घरात कोणी नव्हते त्यामुळे जीवित हानी झाली नाही.

याबाबत त्यावेळी त्यांच्या घराच्या शजारी असलेले इसम महेंद्र बाबुराव शिनगर हे आपले गुळना करत तोंड धुत होते.त्यावेळी त्यांचे लक्ष आकाशातून एक अज्ञात वस्तू त्यांच्या घराच्या दिशेने चकाकत येताना त्यानी पाहिली होती.त्यावेळी तेही घाबरून गेले होते.त्यावेळी जोराचा आवाज होऊन सदर उल्का सदृश वस्तू त्यांच्या शेजारी असलेल्या किरण ठाकरे यांच्या घरावर काही समजायच्या आत पडून त्याचा मोठा आवाज झाला होता.मात्र सुदैवाने घरात कोणी नसल्याने तेथे कोणतीही जीवित हानी झाली नाही.

दरम्यान हि बाब नजीकच्या नागरिकांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना दुरध्ववी करून कळवली होती.त्यांनी त्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांचेसह काही सहकारी घटनास्थळी पाठवले होते.त्यांनी सदर ठिकाणी भेट देऊन सदर घटनेच्या स्थळ पंचनामा केला असून तो पंचनामा घेऊन सदर उल्का सदृश वस्तू कोपरगावचे पोलीस निरीक्षक जाधव यांच्याकडे सोपवली आहे.त्यांनी या संदर्भात खगोलतज्ञ यांचेशी संर्पक साधला असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान याबाबत नगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यातील ग्रामस्थांत विविध उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close