जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात नशेतील पोलिसांस जमावाने मारहाण केल्याची चर्चा ! अदखलपात्र गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव शहरातील संजयनगर उपनगरातील गवळी वाड्यातील काही महिलांना पोलिसांनी मारहाण केल्याची अफवा पसरून त्याचे रूपांतर थेट मध्यस्थी करून भांडण मिटविण्यास गेलेल्या मद्यधुंद पोलिसांना मारहाण झाल्याची अफवा शहरात पसरल्याने कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.या बाबत ग्रुहरक्षक दलाचा आरोपी जवान राजेंद्र दशरथ साळवे याचे विरुद्ध नंदा राजू भंडारी या महिलेने अदखलपात्र गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

शहरात पोलिसांनी चार महिलांना मारहाण केल्याचा आरोप तेथे उपस्थित महिलांनी केला आहे व त्यांनतर जमाव आक्रमक होऊन नशेत असलेल्या पोलिसांना जमावाने मारहाण केल्याची चर्चा पसरली असून या संबंधी आमच्या प्रतिनिधीने पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपला भ्रमणध्वनी उचलला नाही.तथापि एका विश्वसनिय सूत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे संबंधित गाडीचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची खात्रीलायक माहिती दिली असली तरी अधिकृत सूत्रांनी त्यास दुजोरा दिला नाही.

सदरची सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव तालुक्यात सध्या विधानसभेची निवडणूक सुरु असून प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे.त्यासाठी नेते आणि कार्यकर्ते आपल्या जीवाचे रान करत आहे.शहर व तालुक्यात आचार संहितेची कोठेही पायमल्ली होऊ नये यासाठी पोलीस आपल्या डोळ्यात तेल घालून आपले कर्त्यव्य बजावत आहे.असेच रात्री दहाच्या सुमारास जीपसह कर्तव्यावर असलेले शहर पोलीस ठाण्याचे गाडीचालक व दोन गृहरक्षक दलाचे जवान हे संभाजी चौकात असताना तेथे एक तरुण त्यांच्याकडे मदतीसाठी पळत आला असता काही तरुणांनी आपल्याला मारहाण केली असून ते आपला पाठलाग करत असल्याची माहिती दिल्याने पोलिसांनी आपला त्या दिशेकडे मोर्चा वळवला असता त्याना गवळीवाडा परिसरात काही तरुण कट्ट्यावर बसलेले आढळले त्याना या कर्त्यव्यावरील पोलिसांनी हटकले होते.

दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने या घटने बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांचेशी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान संपर्क साधला असता त्यांनी अशी घटना घडली असून त्याबाबत नागरिकांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून यात गृहरक्षक दलाचा जवान वैद्यकीय चाचणीत दोषी आढळल्यास आपण त्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे मात्र यात पोलीस कर्मचारी तथा चालक दोषी दिसत नसल्याचे सांगुन ते गाडीतच होते अशी पुस्ती जोडली आहे.

आक्रमक नागरिक व महिलांनी पोलिसांच्या गाडीची (क्रं. एम.एच.16-एन.525)काही तरुणांनी चावीच काढून घेतल्याने शेवटी तेथील सेनेचे नगरसेवक कैलास जाधव, माजी नगराध्यक्ष दिलीप दारूणकर,संदीप देवकर आदींनी पुढाकार घेऊन संबंधित गाडी घटनास्थळावरून काढून देण्यास मदत केली आहे.

त्यानी या तरुणांना पांगविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला असता एका तरुणांच्या आईने नेमकी तिच्याच मुलाला मारहाण होत असल्याचे पाहिल्याने तिने आरडाओरडा केल्याने नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व अल्पावधीतच तेथे तोबा गर्दी झाली.त्यात काहींनी गल्लीत बसलेल्या महिलांना मारहाण केल्याची अफवा सोडल्याने गर्दी बेकाबू होण्यास प्रारंभ झाला होता.दरम्यान घटनास्थळी आणखी वरिष्ठ अधिकारी आल्याने गर्दीवर ताबा मिळवला.त्यानंतर हि सर्व पक्षीय गर्दी कोपरगाव पोलीस ठाण्याकडे चाल करून गेली.व त्यांनी कर्त्यव्यावर असलेले पोलीस दारूच्या नशेत असल्याचा आरोप केला. व त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली.शिर्डी येथील उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे हे घटनास्थळी आले.त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी संबंधित पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांना पाठवले आहे.

दरम्यान महिलांना मारहाण केली असल्याचा आरोप झाल्याने या महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतल्यावर मात्र या महिलांनी वैद्यकीय तपासनीस नकार दिला असून मारहाण झालीच नसल्याची कबुली दिल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने या प्रकाराबाबत उलट सुलट चर्चा नागरिकांत सुरु झाली आहे.

दरम्यान शहरात पोलिसांनी काही महिलांना मारहाण केल्याची व त्यांनतर नशेत तुर्र असलेल्या पोलिसांना जमावाने मारहाण केल्याची अफवा पसरली असून या संबंधी आमच्या प्रतिनिधीने पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्याशी व उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आपला भ्रमणध्वनी उचलला नाही.तथापि एका विश्वसनिय सूत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे संबंधित गाडीचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची खात्रीलायक माहिती दिली आहे.घटनास्थळी शिवसेना,भाजप,राष्ट्रवादीचे नगरसेवक हजर होते तर पोलीस ठाण्यात भाजपचे एक युवराज,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,सेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,नगरसेवक संदीप पगारे,पप्पू पडियार आदींसह बहुसंख्य कार्यकर्त्यांसह नागरिकांनी गर्दी केली होती,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close