कोपरगाव तालुका
जेऊर-पाटोदा हद्दीतील महिलेने अल्पबचत गटांच्या महिलांना घातला लाखो रुपयांचा गंडा, महिला पतीसह फरार !
संपादक नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
अल्पबचत गटाचे नेतृत्व करणाऱ्या व जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत महादेव मंदिरानजिक अधिवास असलेल्या सत्ताधारी गटाच्या अंतर्गत वर्तुळाशी संलग्न असणाऱ्या लोकप्रतिनिनिधीचे स्वीय सहाय्यकाची जवळची नातेवाईक असलेल्या एका महिलेने व तिच्या पतीराजाने अल्पबचत गटाच्या महिलांचे लाखो रुपये घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने कोपरगाव तालुक्यातील अल्पबचत गटातील महिलांमध्ये खळबळ उडाली आहे.
सूक्ष्म आर्थिक चळवळीचे उद्गाते मोहम्मद युनूस यांनी बांगला देशात बचत गटांचे बीज रोवले व महिलांची काटकसर वृत्ती, व्यवहारातील पारदर्शकता तसेच संघटन कौशल्यामुळे स्वयंसहाय्यता बचत गटाच्या निर्मितीतून त्या कुटुंबाला आर्थिक स्थर्य देऊ शकतात हे त्यांनी आपल्या अथक परिश्रमातून दाखवून दिले व त्याची युनोला दखल घ्यावी लागली.त्याचे अनुकरण भारतात 1997-98 च्या सुमारास केले जाऊ लागले व अल्पबचत गटांची चळवळ आपल्या देशात व राज्यात उदयाला आली. आज त्याचा चांगलाच उपयोग होत असला तरी काही राजकारण्यांनी त्यांच्या नावाचा वापर करून सत्ताही हस्तगत केल्याची उदाहरणे आहेत.तसेच त्याच्या काही पळवाटांचा वापर करून असंघटित व अशिक्षित महिलांना आणखी खोल आर्थिक खड्ड्यात ढकलण्याची प्रयोगही सुरु झाल्याच्या धक्कादायक घटना उघडकीय येऊ लागल्या आहेत.कोपरगावातही अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून जेऊर पाटोदा हद्दीत महादेव मंदिरा नजीक जयस्वाल गल्लीत राहणाऱ्या एका महिलेने व तिच्या पतीराजाने असेच बचत गट स्थापन करून सह्यांचे अधिकार अनाधिकाराने आपल्याकडे घेऊन व किंवा तुमच्या नावावर कर्ज घ्यायचे असल्याची बतावणी करून कोऱ्या धनादेशावर सह्या व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे या माहिलांकडून घेऊन अनेक महिला बचत गटांच्या सदस्याना लाखो रुपयांचा गंडा घालून पोबारा केला आहे.संघटित ताकद व पारदर्शक सहकाराची प्रक्रिया जर एकत्र आली तर विविध प्रकारची उद्योजकता निर्माण होते आणि समाजाच्या प्रगतीला हातभार लावते. या चळवळीतून अनेक प्रकारचे उद्योग जन्माला आले.हे खरे असले तरी येथे नेमके उलटे झाले असून ज्या महिलांच्या व बचतगटांच्या नावावर सत्ता मिळवल्या आज त्या महिलांनी सत्ताधारी गटाच्या लोकप्रतिनिधींकडे तक्रार करूनही उपयोग झालेला नाही.उलट तुम्ही एखादा चांगला वकील पाहून न्यायालायत जा असा अगोचर सल्ला दिला गेल्याने या महिला हतबल झाल्या आहेत.एरवी भांडणे आणि मारामाऱ्या यासाठी हजारो रुपयांची उधळण करणाऱ्यांना या बाबतीत लक्ष घालावेसे वाटत नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बचत गट हे कोठेही नोंदविण्याची किंवा पास करण्याची आवश्यकता नाही. नाबार्डच्या परिपत्रकाप्रमाणे केवळ बचत गटाच्या सदस्यांच्या ठरावाने त्या गटाचे बँकेत खाते काढता येऊ शकते.बचत गटांना बँकेकडून कर्ज मिळावे यासाठी १९९८ पासून केंद्रीय अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे बचत गट काढताना कसल्याही प्रकारचा खर्च येत नाही. ही सेवा पूर्ण मोफत असल्याने या गटांचे पेव फुटलेले त्यातूनच हा प्रकार घडला आला आहे.या गटांचे कुठलेही लेखापरीक्षण होत नाही.त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही त्याचा फायदा आरोपी पती-पत्नीने घेतलेला दिसतो.सदर महिलेनेव तिच्या पतीने पळून जाताना सर्व कागदपत्रे जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे,