जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

खराब रस्त्याचे स्रेय दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रताप उघड,संवत्सर ग्रामस्थांत संताप !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

संवत्सर (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत एक अपवादात्मक खराब असलेला रस्ता संवत्सर येथील जिल्हा परिषद सदस्यांच्या नावावर खपविण्याचा तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांचा निंदनीय प्रकार समोर आल्याने संवत्सर ग्रामस्थांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.

तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना आपल्या मतांची बेगमी करण्यासाठी संवत्सरची उपवाडी असलेल्या लक्ष्मणवाडीला जाण्याचा अनास्था प्रसंग आल्याने त्यांच्या पित्यांनी आपल्या नेत्याचे प्रताप जनतेच्या लक्षात न येण्यासाठी सदर रस्त्यावर अचानक एक फलक झळकावून त्यावर,”सदरचा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असल्याचा” उल्लेख करून संवत्सर येथील जिल्हा परिषद सदस्य यांना बदनाम करण्याचा डाव आखला होता.व त्याची अंमलबजावणी केली होती मात्र सदरची बाब काही चाणाक्ष नागरिकांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्याचा फज्जा उडाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यात संवत्सर ग्रामपंचायत हि प्रगती प्रथावरील ग्रामपंचायत मानली जाते.या ग्रामपंचायतीने माजी सरपंच व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायतीत रस्ते,पाणी योजना,सांस्कृतिक सभागृह,प्राथमिक आरोग्य केंद्रे,मंदिर परिसरात शुशोभिकरण,प्राथमिक शाळा,माध्यमिकव उच्च माध्यमिक शाळा आदी सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात केल्या आहेत.तथापि लक्ष्मणवाडी ते पढेगाव चौकी असा एक रस्ता असून हा रस्त्याचा काही भाग पूर्वी रेल्वे खात्याच्या हद्दीत होता.त्याच्या खाणाखुणा आजही दिसून येत आहे.या रस्त्यावरून एका लोकनेत्याच्या साखर कारखान्याची उसाची अवजड वहातुक याच मार्गाने सातत्याने चालू राहते.त्यामुळे बहुदा हा रस्त्याचे काम तसेच राहिले असावे.पूर्वी शिंगणापूर रेल्वे गेटच्या भुयारी मार्गाचे काम न झाल्याने ऊस वाहतूक बैलगाडी चालक बऱ्याच वेळेस बैलांचा त्रास वाचविण्यासाठी उताराचा अभाव असलेल्या पढेगाव चौकी रस्त्याचा वापर करीत असत.खरे तर हा रस्ता खराब होण्याचे कारण हे असताना सदर भागात आपला प्रचार करण्यासाठी व मते मिळविण्यासाठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना जाण्याचा अनास्था प्रसंग आल्याने त्यांच्या पित्यांनी आपल्या नेत्याचे प्रताप जनतेच्या लक्षात न येण्यासाठी सदर रस्त्यावर अचानक एक फलक झळकावून त्यावर,”सदरचा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असल्याचा” उल्लेख करून संवत्सर येथील जिल्हा परिषद सदस्य यांना बदनाम करण्याचा डाव आखला होता.व त्याची अंमलबजावणी केली होती मात्र सदरची बाब काही चाणाक्ष नागरिकांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांच्या फिरती पथकाचा त्या जागेवर धावा बोल झाल्याने या परमप्रतापी लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांना पळता भुई थोडी झाल्याची बाब उघड झाल्याने या प्रकरणी संवत्सर भागात चौका-चौकात चर्वीत-चर्वण सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close