जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात आठ जणांची माघार तर युती,आघाडीच्या उमेद्वारांसह चौदा जण निवडणूक रिंगणात

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगांव विधानसभा मतदार संघात काल आपले नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शिल्लक बावीस नामनिर्देशन अर्जापैकी आठ जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता रिंगणात भाजप -सेना युतीकडून आ.स्नेहलता कोल्हे,तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून कर्मवीर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांचा तर अपक्ष म्हणून कोपरगाव पालिकेचे अध्यक्ष विजय वहाडणे ,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांचा तर वंचित आघाडीकडून अशोक गायकवाड असे प्रमुख पाच अर्ज शिल्लक राहिल्याने कोपरगावात पंचरंगी लढत पाहावयास मिळणार असली तरी एकूण या निवडणुकीसाठी सर्वमिळून चौदा जण आपले नशीब आजमावत आहे.

कोपरगावसह राज्यातील 288 जागांसाठी येत्या एकवीस ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक आयोगाने होऊ घातली आहे.या निवडणुकीत कोपरगाव विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या अखेरच्या दिवशी तेवीस जणांचे बत्तीस अर्ज आले होते.त्यात छाननीच्या वेळी अपक्ष असलेल्या बाळासाहेब दीक्षित या उमेदवाराचे साक्षीदारांच्या सह्या संशयास्पद असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला होता.त्यामुळे रिंगणात बावीस जणांचे बत्तीस अर्ज शिल्लक होते.त्यामुळे काल आपले नामनिर्देशन कोण मागे घेणार व कोण ठेवणार ? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते.

दरम्यान या निवडणुकीत एकमेकांना खोडा घालण्यासाठी एका नावाचे अनेक उमेदवार देऊन मत विभागणीचा जोरदार प्रयत्न करून शह-काटशह दिलेला दिसून येत आहे.त्यात राजेश परजणे नावाचे दोन उमेदवार दिले आहेत.तसेच अशोक काळे,कोल्हे नावाचे साधर्म्य असलेले उमेदवार असून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना” बॅट “हे चिन्ह मिळू नये यासाठी अनेकांना त्या चिन्हांची मागणी करायला लावून वहाडणे यांना अडथळा आणण्याचा कुटील डाव सत्ताधाऱ्यांनी आखलेला दिसून येत आहे.त्यातच शरद पवारांचे निष्ठावान सहकारी म्हणून ज्यांची गणना होते त्या दीपक साळुंके यांनी आपला अर्ज या निवडणूक रिंगणात ठेवल्याने राष्ट्रवादी कोणताही धोका न पत्करता अधिकची सजग असल्याचे दिसून येत आहे

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा सोमवारी दुपारी तीन वाजेची अंतिम मुदत होती.तीन वाजेच्या आधी.पहिल्यांदा दिलीप मारुतराव तिडके (अपक्ष) यांनी आपला अर्ज मागे घेऊन त्याची सुरुवात केली होती.त्यांनतर खाटिक अल्लाउद्दीन समशुभाई (अपक्ष),लोंढे शरद लक्ष्मण (अपक्ष),आढाव नारायण माधवराव (अपक्ष), आभाळे नानासाहेब मुरलीधर (अपक्ष),आव्हाड प्रभाकर सीताराम (अपक्ष),आगवण ज्ञानदेव देवराम (अपक्ष), टेके रावसाहेब चांगदेव (अपक्ष) आदी आठ जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता रिंगणात खरे पाच प्रबळ दावेदार दिसत आहे. उमेदवारी नामांकन अर्ज राहिलेले उमेदवार आणि त्यांची चिन्हे पुढीलप्रमाणे-आशुतोष अशोकराव काळे (चिन्ह – घड्याळ , पक्ष – नँशनँलिस्ट काँग्रेस पार्टी),स्नेहलता बिपीनदादा कोल्हे (चिन्ह – कमळ , पक्ष – भारतीय जनता पार्टी),माधव सखाराम त्रिभुवन (चिन्ह – हत्ती , पक्ष – बहुजन समाज पार्टी),कवडे शिवाजी पोपटराव (चिन्ह – जेवणाचे ताट , पक्ष – बळीराजा पार्टी),कोल्हे शितल दिगंबर (चिन्ह – कपबशी ,पक्ष – हिंदूस्थान जनता पार्टी),अशोक विजय गायकवाड (चिन्ह – गँस सिलेंडर , पक्ष – अपक्ष) हा उमेदवार अपक्ष जरी दिसत असला तरी त्याना आपला ए व बी फॉर्म देण्यास उशीर झाल्याने ते अपक्ष दिसत असले तरी ते बहुजन वंचित आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असल्याची माहिती त्यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहेया खेरीज.आहिरे मगन पांडुरंग (चिन्ह – ट्रक,पक्ष – अपक्ष) ,उकिरडे सुदाम पंढरीनाथ (चिन्ह – बँट , पक्ष -अपक्ष), काळे अशोक नामदेव (चिन्ह – किटली, पक्ष – अपक्ष),परजणे राजेश सखाहरी (चिन्ह – फलंदाज , पक्ष – अपक्ष)राजेश नामदेवराव परजणे (चिन्ह – आँटो रिक्षा , पक्ष – अपक्ष), वहाडणे विजय सूर्यभान (चिन्ह – शिट्टी , पक्ष – अपक्ष)शाह अलिम छोटू (चिन्ह – मुसळ आणि खलबत्ता,पक्ष – अपक्ष) ,साळुंके दिपक गणपतराव (चिन्ह – ट्रँक्टर चालविणारा शेतकरी , पक्ष – अपक्ष) आदींचे अर्ज शिल्लक असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close