जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील विस्थापितांचे प्रस्थापितांविरुद्ध बंड, धडा शिकविण्याचा निर्धार !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव शहरातील विस्थापित टपरी धारकांना प्रस्थापित पुढाऱ्यांनी न्याय दिला नाही म्हणून त्यांना आत्महत्या करण्याची नामुष्की ओढवली असून या सत्ताधाऱ्यांना कायमचा धडा शिकविण्यासाठी आम्ही निर्धार केला असून या पुढे कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रतिपादन अजय विघे व माजी नगरसेवक बालचंदभाई लकारे यांनी एका टपरिधारकांच्या बैठकीत केल्याने कोपरगावच्या राजकीय आसमंतात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहरातील व तालुक्यातील नेत्यांनी आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन धारणगाव रस्त्यालगत रांगोळ्या काढून या टपरीधारकांच्या जखमेवर मीठ चोळले होते.त्यावेळी आमच्या प्रतिनिधीने हा डाव टपरी धारकांच्या लक्षात आणून देऊन त्याना सावध केले होते.मात्र त्यांच्यात संघटनांत्मक अभाव असल्याने पुढे फार काही निष्पन्न होऊ शकले नव्हते.त्यानंतर कोपरगाव नगरपरिषदेत सत्तेत येणाऱ्याने प्रत्येक निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन या टपरीधारकांचा वापर करून घेतला व त्याना नंतर वाऱ्यावर सोडून दिले.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव शहरात अतिक्रमण तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ,पी.अन्बलगन व प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांनी शासन आदेशाप्रमाणे हटवले होते.त्यात दहा मार्च 2011 रोजी सुरु झालेली हि अतिक्रमण विरोधी मोहीम जवळपास आठवडाभर सुरु होती त्यात जवळपास दोन हजार अधिक दुकानाचा चक्काचूर सरकारी जे.सी.बी.नी केला होता.अनेकांचे त्यामुळे संसार उघड्यावर आले होते.अनेकांनी कर्ज काढले मात्र व्यवसाय नसल्याने त्याना ते परतफेड करता आले नाही.अनंत वेदना टपरीधारकांना सहन कराव्या लागल्या.मात्र त्यावेळी प्रत्येक राजकीय पक्षाने व त्यांच्या नेत्यांनी आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन धारणगाव रस्त्यालगत रांगोळ्या कडून या टपरीधारकांच्या जखमेवर मीठ चोळले होते.त्यावेळी आमच्या प्रतिनिधीने या डाव या टपरी धारकांच्या लक्षात आणून देऊन त्याना सावध केले होते.मात्र त्यांच्यात संघटनात्मक अभाव असल्याने पुढे फार काही होऊ शकले नव्हते.त्यानंतर कोपरगाव नगरपरिषदेत सत्तेत येणाऱ्याने प्रत्येक निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन या टपरीधारकांचा वापर करून घेतला व त्याना वाऱ्यावर सोडून दिले.त्यांनी आमदार,खासदार,नगराध्यक्ष,मंत्री यांचेकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांचा थापा व मनस्ताप य यापलीकडे या मंडळींनी काहीच दिले नाही,परिणामस्वरूप या टपरीधारकांवर आत्महत्या करण्याचा अनास्था प्रसंग गुदरला.त्यात टपरीधारक उद्वस्त झाले त्याचे कुटुंब रस्त्यावर आले.मात्र या निर्दयी राजकारण्यांना दया आली नाही त्यांनी केवळ आपल्या सत्तेच्या पोळ्या भाजून घेतल्या. त्यामुळे टपरीधारकांमध्ये अच्छा-खांसा असंतोष आहे.आज दुपारी त्याची प्रचिती आली असून दुपारी चार वाजेच्या सुमारास कोपरगाव नगरपरिषदेच्या खुले नाट्यगृहात या टपरीधारकांनी तातडीची बैठक घेतली व त्यात टपरिधारकांना रस्त्यावर आणणारांचा निषेध करण्यात आला.व आगामी काळात जे आपल्या प्रश्नाला न्याय देतील त्यांच्या सोबत जाणार असल्याचा निर्वाळा देण्यात आला.कोणी खोटी आश्वासने दिली ते आम्हीं डोळ्यांनी पहिले आहे.अनुभवले आहे.त्यामुळे तालुक्यात साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी आणल्याच्या निव्वळ घोषणा चालू आहे,तो निधी नेमका कुठे गेला आहे असा रोकडा सवालही विघे यांनी केला आहे.

सदर प्रसंगी सुरेश त्रिभुवन,नईम मणियार,पसिउद्दीन कुरेशी,राजेंद्र लोहकरे,संतोष भुजबळ,दीपक त्रिभुवन,रघुनाथ भुजबळ,दीपक पवार,प्रकाश पहिलवान,मुन्नाभाई खलिपा, इस्माईल शेख,शबीर मौलाना,राजू जाधव आदी टपरीधारक,बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close