जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगाव शहरासाठीच्या तलावाचे काम सुरु-..या नेत्याची माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरासाठी पिण्याचे पाणी पुरविण्यात भविष्यात अहंम भूमिका निभावण्यात मोलाची भूमिका निभावणाऱ्या ५ क्रमांक साठवण तलावाच्या १३१ कोटीच्या पाणी योजनेच्या ५ क्रमांकाच्या साठवण तलावास आज लक्ष्मी कन्ट्रक्शन या कंपनीने शुभारंभ केला असल्याची माहिती आज श्री साई संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी आमची प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांनीं समाधान व्यक्त केले आहे.

“वीज बिलात बचत करण्यासाठी हि योजना यशस्वी पणे चालविण्यासाठी व विद्युत बिल खर्च कमी करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे.त्यातून ३६५ व २३० के.व्ही.ए.इतकी अनुक्रमे वीज निर्माण करण्यात येणार आहे.त्यासाठी १.९३ कोटींचा खर्च येणार आहे”-शांताराम गोसावी,मुख्याधिकारी,कोपरगाव नगर परिषद.

कोपरगाव शहर पाणी योजनेसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत १३१.२४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.त्याची निविदा नुकतीच जाहीर झाली असून सदरचे काम गुजरात मधील सुरत येथील ‘लक्ष्मी कन्ट्रक्शन’ या कंपनीस दिले आहे सदर काम चाचणी कालावधीसह दोन वर्षात दि.३० जून २०२४ पूर्वी पूर्ण करावयाचे आहे.राज्यातील नगर परिषद निवडणुका जाहीर होऊन राज्य सरकारने त्यास आरक्षणाच्या मुद्यावरून स्थिगिती दिली होती ती आता उठली आहे.मात्र सरकार आगामी निवडणुका या दिवाळीनंतर घेणार असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे सदर तलावाचे काम प्रारंभ करण्यास सत्ताधारी गटास नामी संधी मिळाली आहे.

कोपरगाव शहरासाठी यापूर्वी चार साठवण तलाव असताना व जलसंपदा विभागाकडून पुरेसे पाणी मंजूर असतानाही शहराला पाणी कमी आहे असा जावई शोध लावून त्यावर आपल्या राजकीय फायद्यासाठी बनाव उभा करणाऱ्या व ४२ कोटींच्या केंद्रीय पाणी योजनेची वासलात लावणाऱ्या व कारण नसताना निळवंडे धरणाच्या जलवाहिणीचे गाजर दाखविणाऱ्या नेत्यांना चाप लावण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शहरासाठी नवीन पाणी मंजुर केले होते.या शिवाय साठवण तलावाची उणीव दूर करण्यासाठी कोपरगाव शहरासाठी नूतन साठवण तलावासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत १३१.२४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.त्याची निविदा नुकतीच जाहीर झाली असून सदरचे काम गुजरात मधील सुरत येथील ‘लक्ष्मी कन्ट्रक्शन’ या कंपनीस दिले आहे सदर काम चाचणी कालावधीसह दोन वर्षात दि.३० जून २०२४ पूर्वी पूर्ण करावयाचे आहे.आता सदर कंपनीने पाच क्रमांकाच्या तलावातील पाणी उपसा करण्यास प्रारंभ केला आहे.या आधी त्यांच्या कार्यकर्त्यांनी संजयनगर या उपनगरातील उंच पाण्याची टाकीच्या कामाचा शुभारंभ केला होता.
आज त्यांनी सदर कामाची अधिकृत घोषणा केली आहे.

सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,जावेद शेख,राजेंद्र फुलफगर,माजी नगरसेवक कृष्णा आढाव,संतोष चवंडके,कोपरगाव नगरपरिषदेचे शहर अभियंता सुनील ताजवे,पाणी पुरवठा अधिकारी ऋतुजा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी ते म्हणाले की,”या योजनेत एकूण चार जलकुंभ असून याखेरीज एक मुख्य जलकुंभ आहे.सदर तलाव हा सिमेंट कॉंक्रिट मध्ये बांधण्यात येणार असून त्याला खालच्या बाजूस,’जिओ मेमरेन’ नावाची फिल्म टाकण्यात येणार आहे.त्यामुळे पाणी गळतीस प्रतिबंध होणार आहे.राज्यात अशा प्रकारचा तलाव बारामती,श्रीरामपूर या ठिकाणी असून आता कोपरगावात अशा प्रकारचा तलाव तयार होणार आहे.याशिवाय जुने चार तलाव असून त्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.तशी तरतूद या योजनेत करण्यात आलेली असल्याची माहितीची आ.काळे यांनी शेवटी दिली आहे.

“वीज बिलात बचत करण्यासाठी हि योजना यशस्वी पणे चालविण्यासाठी व विद्युत बिलकामी करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे.त्यातून ३६५ व २३० के.व्ही.ए. इतकी अनुक्रमे वीज निर्माण करण्यात येणार आहे.त्यासाठी १.९३ कोटींचा खर्च येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली आहे.

सदर योजनेचे काम वेळेवर करण्यासाठी मुख्याधिकारी गोसावी दर आठवड्यास तर आ.काळे हे दर पंधरवाड्यास आढावा बैठक घेणार आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या असून त्यांना चोवीस महिन्यात या नूतन योजनेचे पाणी पिण्यास मिळणार असल्याची चर्चा नागरिकांत सुरु झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close