जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगांव मतदार संघात नऊ मतदार केंद्राच्या जागेत बदल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगांव (प्रतिनिधी )

कोपरगांव विधानसभा मतदार संघातील नऊ मतदान केंद्राच्या जागेत बदल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्र बदलाचे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले आहेत ते खालील प्रमाणे आंचलगाव येथील जि.प.शाळा पुर्व पच्छिम ईमारत पुर्वेकडून खोली क्रमांक १ (मतदान केंद्र क्रमांक ५१) हे केंद्राचे ठिकाण बदलले असून आंचलगाव येथील जि.प.शाळा नविन,दक्षिणोत्तर इमारत दक्षिणेकडून खोली क्रमांक १ येथे निच्छित करण्यात आले आहे.करंजी येथील जि.प.शाळा (मतदान केंद्र क्रमांक ५३) हे ठिकाण बदलले असून जि.प.शाळा करंजी बु।। पुर्वपच्छिम इमारत पच्छिमेकडून खोली क्रमांक १ येथे निच्छित करण्यात आले आहे.करंजी बु।। येथील जि.प.शाळा (मतदान केंद्र क्रमांक ५४) हे ठिकाण बदलले असून जि.प.शाळा करंजी बुद्रूक पुर्वपच्छिम इमारत पच्छिमेकडून खोली क्रमांक २ येथे निच्छित करण्यात आले आहे.करंजी येथील जि.प.शाळा (मतदान केंद्र क्रमांक ५५) हे ठिकाण बदलले असून जि.प.शाळा करंजी पुर्वपच्छिम इमारत पच्छिमेकडून खोली क्रमांक ३ येथे निच्छित करण्यात आले आहे.कोपरगांव येथील एस.जी.प्राथमिक शाळा,भैरवनाथ मंदिर दक्षिणोत्तर इमारत उत्तरेकडील खोली क्रमांक १ (मतदान केंद्र क्रमांक ११८) हे ठिकाण बदलले असून मराठा पंच मंडळ,सांस्कृतिक भवन,वेशीजवळ,कोपरगांव येथे निच्छित करण्यात आले आहे.कोपरगांव येथील एस.जी.प्राथमिक शाळा,भैरवनाथ मंदिर दक्षिणोत्तर इमारत उत्तरेकडील खोली क्रमांक २ (मतदान केंद्र क्रमांक ११९) हे ठिकाण बदलले असून आनंद सांस्कृतिक भवन,बाजारतळ,कोपरगांव येथे निच्छित करण्यात आले आहे.डाऊच बु।। येथील जि.प.शाळा,पूर्व पच्छिम ईमारत, पुर्वेकडील खोली क्रमांक २ (मतदान केंद्र क्रमांक १७२) हे ठिकाण बदलले असून जि.प.शाळा डाऊच बु।। दक्षिणोत्तर इमारत उत्तरेकडून खोली क्रमांक १ येथे निच्छित करण्यात आले आहे.भोजडे येथील जि.प.शाळा,पूर्व पच्छिम ईमारत, पुर्वेकडील खोली क्रमांक १ (मतदान केंद्र क्रमांक १८७) हे ठिकाण बदलले असून जि.प.शाळा भोजडे नवीन दक्षिणोत्तर इमारत दक्षिणेकडील खोली क्रमांक १ येथे निच्छित करण्यात आले आहे.भोजडे येथील जि.प.शाळा,पूर्व पच्छिम ईमारत, पुर्वेकडील खोली क्रमांक ३ (मतदान केंद्र क्रमांक १८८) हे ठिकाण बदलले असून जि.प.शाळा भोजडे नवीन दक्षिणोत्तर इमारत दक्षिणेकडील खोली क्रमांक २ येथे निच्छित करण्यात आले आहे.या प्रमाणे कोपरगांव विधानसभा मतदान केंद्राची एकुण नऊ ठिकाणात बदल करण्यात आला असून या केंद्रावरील मतदारांनी बदललेली ठिकाणे लक्षात घेवून सोमवार दि.२१ आँक्टोबर २०१९ रोजी सकाळी ७:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत मतदान करावे.असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे आदीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close