जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहरात नागरिकांसाठी पुन्हा संचारबंदी वाढवली

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्या मध्ये कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने परिस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी दि.०८ मे ते १५ मे रोजी सकाळी ७ वाजे पर्यंत जनता संचारबंदी आयोजित केली असल्याने नागरिकांनी कोणीही घर सोडून बाहेर पडू नये असे आवाहन नुकतेच कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.

कोरोनाच्या महामारीने आता देशात हाहाकार माजवला आहे.आता रोजची रुग्णवाढ ही चार लाखांच्या घरात पोहोचली आहे.गेल्या काही दिवसांत देशभरात ऑक्सिजन आणि इतर साहित्यांचा तुटवडा जाणवत असून त्यामुळे हजारो रुग्णांचा जीव जात आहे.भारताच्या या संघर्षाला आता जागतिक स्तरावरून साथ मिळत असून अमेरिका,ब्रिटन सहित जवळपास चाळीस देशांतून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.कोरोना कमी होत नसल्याने त्यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आता संचारबंदी व टाळेबंदीशिवाय पर्याय नाही त्याची अंमलबजावणी सरकारने करावी असे आदेश दिले आहे.कोपरगाव शहर व तालुक्यातही हाच पेच तयार झाला असून त्यावर आता संचारबंदी हाच पर्याय आहे असे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सुचवला आहे.

त्यानी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव शहरात आठ दिवस जनता संचारबंदी असूनही कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी कमी झालेली नसल्याने दोन दिवसाचा थांबा घेऊन कोरोना प्रतिबंध करणेकामी कोपरगाव शहरातील स्थानिक नागरिक,व्यापारी व सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचे मागणीनुसार रविवार दि.०९ मे रोजी दुपारी ३ वाजेपासून ते शनिवार दि.१५ मे रोजी सकाळी ७.०० वा पर्यंत जनता संचारबंदी वाढवण्यात आली आहे.

या कालखंडात फक्त शहरातील दवाखाने,औषधालाये (२४ तास),पाणी जार,दुध व पीठ गिरणी आदी सेवा सकाळी ७ ते ११ वाजे पर्यंत सुरु राहतील. या शिवाय भाजीपाला,फळे,किराणा व इतर सर्व व्यवसाय शत-प्रतिशत बंद राहतील.कोपरगाव शहरातील सर्व नागरिक,आस्थापना,व्यापारी सर्वांनी याची नोंद घ्यावी.कोरोनाचा प्रादुर्भाव व मृत्युचे थैमान थांबविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करून प्रत्येकाने स्वतःचा व कुटूंबाचा बचाव करावा असे आवाहनही नगराध्यक्ष विजय वहाडणे,उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,गटप्रमुख,नगरसेवक आदींनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close