जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यांसाठी समाजकल्याणचा १७.३० लाखांचा निधी मंजूर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नगर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्याला १७ लाख ३० हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे यांनी दिली आहे.त्याबाबत आ.काळे यांनी अभिनंदन केले आहे.

कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्यांनी सातत्याने पाठपुरावा करून कोपरगाव तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळविला आहे.त्याचबरोबर शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा देखील फायदा समाजातील बहुसंख्य घटकांना मागील चार वर्षात मिळाला आहे-सोनाली साबळे.सदस्य जि.प.सदस्य.

कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्यांनी सातत्याने पाठपुरावा करून कोपरगाव तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळविला आहे.त्याचबरोबर शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा देखील फायदा समाजातील बहुसंख्य घटकांना मागील चार वर्षात मिळाला आहे. मागील वर्षापासून देशात व राज्यात जीवघेण्या कोरोना महामारीचा धुमाकूळ सुरु आहे.यावर्षी तर या साथीने अधिक उग्र रूपधारण केले आहे तरी देखील जिल्हा परिषदेकडे निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरूच होते.या प्रयत्नातून समाज कल्याण विभागाच्या २० टक्के सेस फंडातून २०२०/२१ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती,जमाती व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी २३ कडबा कुट्टी मशीन,१४ इलेक्ट्रिक मोटार,३४ शिलाई मशीन यासाठी नऊ लाख एक्याऐंशी हजार तसेच ५ टक्के सेस फंडातून अपंग लाभार्थ्यांसाठी १४ दिव्यांग व्यक्तींना स्वयं रोजगारासाठी पिठाच्या गिरणीसाठी प्रत्येकी १३हजार,लघु उद्योगासाठी ८ व्यक्तींना प्रोत्साहनपर अनुदान प्रत्येकी १६ हजार ,औषध उपचारासाठी ११ व्यक्तींना प्रत्येकी २० हजार व बहु विकलांग ८ व्यक्तींच्या पालकांना प्रत्येकी २० हजार अर्थसहाय्य असे एकून १७ लाख तीस हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याचे जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे यांनी शेवटी सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close